मुंबई - म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांमध्ये २०१७-१८ या आर्थिक वर्षात ३२ लाखांची वाढ झाली. पण अद्यापही देशातील केवळ १.५ टक्के लोक या क्षेत्रात गुंतवणूक करतात. हे गुंतवणूदारही फक्त ३० शहरांमधील आहेत, असे असोसिएशन आॅफ म्युच्यअल फंड्स इन इंडियाचे (एएमएफआय) म्हणणे आहे.
एएमएफआयने २०१७-१८ या आर्थिक वर्षातील म्युच्युअल फंडाचा अभ्यास अहवाल बुधवारी जाहिर केला. देशाची लोकसंख्या १३२ कोटी आहे. त्यापैकी ७५ कोटी जनतेची बँकांमध्ये खाती आहेत, तर ३५ कोटी लोकांनी स्वत:चा विमा उतरवला आहे. शिवाय २९ कोटी पॅनकार्डधारक आहेत. पण म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचा आकडा फक्त ६.६ कोटी आहे. यापैकी फक्त २ कोटी गुंतवणूकदार हे दीर्घकालिन अर्थात स्थिर आहेत. हा आकडा वाढविण्यासाठी असोसिएशनने मार्च २०१७ पासून वर्षभर विशेष उपक्रम चालवला होता. हाच उपक्रम २०१८-१९ या आर्थिक वर्षातही राबवला जाणार आहे.
नवे नियम पोषक
वर्षभरात ५० लाख नवीन गुंतवणूकदार ३० शहरांच्या व्यतिरिक्त देशाच्या अन्य भागांतून तयार मिळावेत, असा प्रयत्न केला जाईल. सेबीने मागील आठवड्यात जाहिर केलेली नवीन नियमावलीसुद्धा म्युच्युअल फंड गुंतवणूक वाढीसाठी पोषक ठरेल, असे मत एएमएफआयचे अध्यक्ष ए. बालसुब्रमण्यम यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
१.५ टक्के लोकांचीच म्युच्युअल फंडात गुंतवणूक
म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांमध्ये २०१७-१८ या आर्थिक वर्षात ३२ लाखांची वाढ झाली. पण अद्यापही देशातील केवळ १.५ टक्के लोक या क्षेत्रात गुंतवणूक करतात. हे गुंतवणूदारही फक्त ३० शहरांमधील आहेत, असे असोसिएशन आॅफ म्युच्यअल फंड्स इन इंडियाचे (एएमएफआय) म्हणणे आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 01:07 AM2018-04-05T01:07:48+5:302018-04-05T01:07:48+5:30