Join us

रिझर्व्ह बॅँक ओतणार १५ हजार कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 5:25 AM

पुढील महिन्यामध्ये सरकारी रोख्यांची लिलावाद्वारे विक्री करून भारतीय रिझर्व्ह बॅँक अर्थव्यवस्थेमध्ये १५ हजार कोटी रुपये ओतणार आहे.

नवी दिल्लीः पुढील महिन्यामध्ये सरकारी रोख्यांची लिलावाद्वारे विक्री करून भारतीय रिझर्व्ह बॅँक अर्थव्यवस्थेमध्ये १५ हजार कोटी रुपये ओतणार आहे. देशात रोकड टंचाई जाणवू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पैसा खेळता राहावा यासाठी त्याचे योग्य नियोजन करण्याची जबाबदारी भारतीय रिझर्व्ह बॅँकेकडे असते. त्यानुसार देशातील अर्थव्यवस्थेचा व चलनाचा आढावा घेऊन त्यानुसार धोरण ठरविले जाते. शुक्रवारी भारतीय रिझर्व्ह बॅँकेने आगामी धोरणाबाबतची घोषणा केली.पुढील महिन्यामध्ये खुल्या बाजारातून १५ हजार कोटी रुपयांच्या सरकारी रोख्यांची विक्री करून तो पैसा चलनात आणून रोकड टंचाई जाणवणार नाही, यासाठी रिझर्व्ह बॅँक प्रयत्न करणार आहे. तसेच यानंतर तीन महिन्यांनी पुन्हा याबाबतचा आढावा घेतला जाणार आहे.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक