नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या पीएलआय योजनेंतर्गत १६ मोबाइल उत्पादक कंपन्यांना भारतात उत्पादन प्रकल्प उभारण्याची परवानगी इलेक्ट्रॉनिक्स व आयटी मंत्रालयाने दिली आहे. या कंपन्या येत्या ५ वर्षांत १०.५ लाख कोटी रुपयांचे उत्पादन व ६.५ लाख कोटी रुपयांची निर्यात करतील, अशी अपेक्षा आहे.
१५ हजार आणि त्यापेक्षा जास्त किमतीचे मोबाइल फोन उत्पादित करण्यासाठी काही विदेशी कंपन्यांनाही परवानगी देण्यात आली आहे. त्यात सॅमसंग, फॉक्सकॉन हॉन हाई, रायझिंग स्टार, विस्ट्रॉन आणि पेगॅट्रॉन यांचा समावेश आहे. यातील फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगॅट्रॉन या तीन कंपन्या अॅपल आयफोनसाठी उत्पादन करतात.
अॅपल (३७ टक्के) आणि सॅमसंग (२२ टक्के) या दोन कंपन्यांची जागतिक मोबाइल फोन विक्रीतील भागीदारी जवळपास ६० टक्के आहे. या योजनेमुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.
या योजनेत परवानगी मिळालेल्या स्वदेशी कंपन्यांत लावा, भगवती (मायक्रोमॅक्स), पॅजेट इलेक्ट्रॉनिक्स, यूटीएल निओलिंक्स आणि आॅप्टिएम्स इलेक्ट्रॉनिक्स यांचा समावेश आहे. सहा कंपन्यांना ‘स्पेसीफाइड इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स सेगमेंट’ या शीर्षाखाली मंजुरी देण्यात आली आहे.
१६ मोबाइल उत्पादकांना मंजुरी; येत्या ५ वर्षांत १०.५ लाख कोटी रुपयांचे उत्पादन करणार
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या पीएलआय योजनेंतर्गत १६ मोबाइल उत्पादक कंपन्यांना भारतात उत्पादन प्रकल्प उभारण्याची परवानगी इलेक्ट्रॉनिक्स व आयटी ...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 03:01 AM2020-10-08T03:01:08+5:302020-10-08T03:01:17+5:30