मुंबई : मुद्रा बँक योजनेंतर्गत राज्यात १६ हजार ९७६ कोटी ७६ लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले असून, गतवर्षीच्या तुलनेत ३ हजार ६०४ कोटी ३४ लाख रुपयांनी अधिक आहे, अशी माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
मुद्रा बँक योजनेतून शिशू गटासाठी ५० हजार रुपयांपर्यंत, किशोर गटासाठी ५०,००१ ते ५ लाख रुपयांपर्यंत आणि तरुण गटासाठी ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत कर्जपुरवठा केला जातो. राज्यातील युवक-युवती, जे स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरू करू इच्छितात, त्यांना मुद्रा बँकेचा अधिक लाभ व्हावा व कर्ज मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, म्हणून जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची स्थापना केली आहे. त्यामुळे मुद्रा बँँक योजनेच्या कार्यात सुसूत्रता येऊन, त्याचे फलित संपलेल्या आर्थिक वर्षात वितरित करण्यात आलेल्या वाढीव वित्तीय सहाय्याच्या रूपाने दृष्टीपथात आले आहे.
संयुक्त राष्ट्र संघाच्या सहकार्याने नियोजन विभागात ‘वॉर अगेन्स्ट पॉवर्टी’ या विषयावर लक्ष केंद्रित करून, वॉर रूम स्थापित करण्यात येत आहे, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
मुद्रा बँक योजनेतून १६ हजार कोटींचे कर्ज
मुद्रा बँक योजनेंतर्गत राज्यात १६ हजार ९७६ कोटी ७६ लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले असून, गतवर्षीच्या तुलनेत ३ हजार ६०४ कोटी ३४ लाख रुपयांनी अधिक आहे
By admin | Published: April 19, 2017 02:27 AM2017-04-19T02:27:34+5:302017-04-19T02:27:34+5:30