Join us  

रेल्वे मिळवणार १६ हजार कोटी

By admin | Published: January 12, 2017 12:39 AM

प्रवासी भाड्यात वाढ करूनही तोटा कमी होत नसल्याने, रेल्वे प्रशासनाने उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळे मार्ग शोधण्यास सुरुवात केली असून

नवी दिल्ली : प्रवासी भाड्यात वाढ करूनही तोटा कमी होत नसल्याने, रेल्वे प्रशासनाने उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळे मार्ग शोधण्यास सुरुवात केली असून, जाहिरातींद्वारे पुढील १0 वर्षांत १६ हजार ५00 कोटी रुपये महसूल मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी प्लॅटफॉर्मवर विविध बँकांचे एटीएम बसवण्यात येतील, तसेच तीन हजार रेल्वे हजार स्थानकांवर डिस्प्ले नेटवर्क उभारले जाईल. जाहिरातींसाठी रेल्वे रेडिओचाही वापर केला जाईल. प्रवासी भाड्याखेरीज मिळणाऱ्या महसूल योजनेत भागीदारीसाठी खासगी व सार्वजनिक क्षेत्रांतील कंपन्यांसाठी रेल्वेने धोरण जाहीर केले आहे. प्रवासी भाड्याखेरीज अधिक महसूल मिळवण्यास कंत्राटे काढली जातील आणि ही प्रक्रिया पारदर्शी असेल, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. त्यांनी २0१६-१७ च्या रेल्वे अर्थसंकल्पात महसूल वाढवण्याची घोषणा केली होती. आतापर्यंत महसुलात ४३ टक्के वाढ झाली असली, तरी ती पुरेशी नाही, असे प्रभू म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)उत्पन्नासाठी  काय?जाहिरातींसाठी स्थानकाबाहेर, प्लॅटफॉर्म, पादचारी पूल, क्रॉसिंग गेट आदी उपलब्ध करून देणार. १0 वर्षांसाठी जाहिरातींची कंत्राटे दिली जातील. यासाठी मुंबई व दिल्ली वगळता एक किंवा अनेक विभागांसाठी अर्ज संयुक्तपणे मागवले जातील. ही प्रक्रिया ई-अ‍ॅक्शनद्वारे होईल. रेल्वेच्या बाहेर-आत जाहिराती लावल्या जातील. याची सुरुवात शताब्दी आणि राजधानी एक्स्प्रेसद्वारे होईल.   रेल्वे गाड्या, तसेच प्लॅटफॉर्मवर आॅडिओ किंवा व्हिडीओ प्रणालीद्वारे कमाई केली जाईल. दोन्ही प्रणालींद्वारे फिल्म, टीव्ही-शो किंवा माहितीपर कार्यक्रमांचे प्रसारण केले जाईल. याद्वारे 10 वर्षांत6000 कोटी उत्पन्न मिळण्याची रेल्वेला अपेक्षा आहे.