Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘एआयआयबी’कडून भारताला १६0 दशलक्ष डॉलरचे कर्ज

‘एआयआयबी’कडून भारताला १६0 दशलक्ष डॉलरचे कर्ज

चीन पुरस्कृत एशिएन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने (एआयआयबी) भारताच्या आंध्र प्रदेशातील वीजव्यवस्था सुधारणा

By admin | Published: May 4, 2017 12:56 AM2017-05-04T00:56:26+5:302017-05-04T00:56:26+5:30

चीन पुरस्कृत एशिएन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने (एआयआयबी) भारताच्या आंध्र प्रदेशातील वीजव्यवस्था सुधारणा

$ 160 million loan from AIIB to India | ‘एआयआयबी’कडून भारताला १६0 दशलक्ष डॉलरचे कर्ज

‘एआयआयबी’कडून भारताला १६0 दशलक्ष डॉलरचे कर्ज

बीजिंग : चीन पुरस्कृत एशिएन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने (एआयआयबी) भारताच्या आंध्र प्रदेशातील वीजव्यवस्था सुधारणा प्रकल्पाला १६0 दशलक्ष डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे. भारतातील प्रकल्पाला एआयआयबीकडून कर्ज मंजूर होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
एआयआयबीमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकाचा मोठा भागधारक आहे. चीन पहिल्या स्थानी आहे. आंध्र प्रदेशातील वीज पारेषण आणि वितरणव्यवस्थेत सुधारणा करण्याच्या प्रकल्पाला बँकेने कर्ज दिले आहे. बँकेच्या वतीने अधिकृत निवेदन जारी करून ही माहिती देण्यात आली.
‘२४Ÿ७ सर्वांसाठी ऊर्जा’ नावाचा हा प्रकल्प भारत सरकारच्या २0१४ साली सुरू करण्यात आलेल्या ‘सर्वांसाठी ऊर्जा’ योजनेचा भाग आहे. निवडक राज्यांत सर्वांना पाच वर्षांत कार्यक्षम, विश्वसनीय आणि परवडणारी वीज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पाला जागतिक बँकेनेही अर्थसाह्य केले आहे. एआयआयबी बँकेचे अध्यक्ष जीन लिकून यांनी सांगितले की, बँक आपल्या सदस्य देशांना वीज वहन आणि वितरण यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी अर्थसाह्य करीत आहे. एआयआयबी भारतासोबत निकटतम पातळीवर काम करीत आहे, याचा मला आनंद आहे. कारण भारत हा आमचा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा भागीदार आहे. आंध्र प्रदेशातील ‘२४Ÿ७ सर्वांसाठी ऊर्जा’ हा प्रकल्प आम्ही अर्थसाह्य करीत असलेल्या पहिल्या अनेक प्रकल्पांपैकी एक
आहे. (वृत्तसंस्था)

व्यवसाय आणि शेतीलाही थेट लाभ मिळेल

बँकेच्या निवेदनात म्हटले की, या प्रकल्पामुळे आंध्र प्रदेश आणि भारताच्या आर्थिक विकासाला थेट योगदान मिळेल. विश्वसनीय, ग्रीड आधारित वीज घरोघर पोहोचण्यास त्यामुळे मदत होईल. व्यवसाय आणि शेतीलाही त्याचा थेट लाभ मिळेल.

Web Title: $ 160 million loan from AIIB to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.