- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : देशात एकानंतर एक बँकिंग घोटाळे समोर येत आहेत. या आर्थिक गैरव्यवहारांची आकडेवारीही डोळे पांढरी करणारी आहे. या बड्या माशांचे नाव उजेडात आले; पण देशात असेही लोक आहेत की, ज्यांनी १ कोटीपेक्षा अधिकचे कर्ज थकविले आहे. असे १७ हजार २६२ करोडपती खातेदार आहेत ज्यांनी तब्बल २ लाख ५८ हजार ५९४ कोटी रुपयांचे कर्ज थकविले आहेत. या करोडपती थकबाकीदारांनी राष्ट्रीयीकृतच नव्हे तर खासगी व विदेशी बँकांनाही चुना लावला आहे.
पंजाब नॅशनल बँकेत नीरव मोदी यांनी केलेला घोटाळा समोर आला आणि त्यानंतर एकानंतर एक अन्य बँकेत झालेले घोटाळेही उजेडात येऊ लागले. देशात कर्जबुडव्यांची संख्या खूप मोठी आहे. राष्ट्रीयीकृत १८ बँका आहे त्यांच्याकडे ३०२५ करोडपती खातेदार असे आहेत की, त्यांनी ४४ हजार ८१ कोटींचे कर्ज थकविले आहे. १६ विदेशी बँकांच्या २११ खातेदारांकडे ६ हजार २६० कोटींचे कर्ज थकीत आहे.
देशातील १८ खासगी बँकांच्या ५५९ खातेदारांनी १० हजार
७४८ कोटींचे कर्ज थकविले
आहे. तसेच एसबीआय आणि असोसिएट ६ बँकांनी मिळून ६०९ खातेदारांना १४ हजार २५२
कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे.
या बड्या उद्योगपतींनी कोट्यवधींचे कर्ज थकविल्यानेच
बँकांच्या एनपीएने डोंगर गाठला आहे.
>कर्जबुडव्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
राज्य खातेदारांची संख्या थकीत कर्ज (रुपयांत)
महाराष्ट्र ४७५५ ८१ हजार ४९५ कोटी
दिल्ली १५११ २८ हजार ८८७ कोटी
पश्चिम बंगाल १७९४ २६ हजार ८८७ कोटी
तामिळनाडू १३३७ १९ हजार ८८८ कोटी
गुजरात १२४२ १७ कोटी ६४९ कोटी
१७ हजार कोट्यधीश थकबाकीदार
देशात एकानंतर एक बँकिंग घोटाळे समोर येत आहेत. या आर्थिक गैरव्यवहारांची आकडेवारीही डोळे पांढरी करणारी आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:05 AM2018-03-03T00:05:03+5:302018-03-03T00:05:03+5:30