नवी दिल्ली : सरकार २०२२ पर्यंत १,७५,००० मेगावॅट अक्षय ऊर्जा उत्पादनासाठी बांधील आहे, असे सरकारने सांगितले. यात एक लाख मेगावॅट वीज सौर ऊर्जा असेल.
वीज, कोळसा व नवीकरणीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी येथे मंगळवारी सांगितले. ते विज्ञान भवनमध्ये केंद्र व राज्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करीत होते. गोयल म्हणाले की, आम्ही सौर ऊर्जा क्षेत्रात १ लाख मेगावॅट उत्पादनासाठी प्रतिबद्ध आहोत. यातील ४० हजार मेगावॅट रुफटॉप (छतावर) व उर्वरित इतर कार्यक्रमांतून तयार केली जाईल. २०२२ पर्यंत १,७५,००० मेगावॅट वीज निर्मितीचे आमचे लक्ष्य आहे. पंतप्रधान वीज निर्मितीसाठी बांधील आहेत. ते केवळ यासंदर्भात बोलत नसून त्यासाठी आवश्यक ती उपाययोजनाही करीत आहेत.हा विषय त्यांच्या जिव्हाळ््याचा आहे, असे गोयल म्हणाले.
‘२०२२ पर्यंत १.७५ लाख मे.वॅ. वीजनिर्मिती’
सरकार २०२२ पर्यंत १,७५,००० मेगावॅट अक्षय ऊर्जा उत्पादनासाठी बांधील आहे, असे सरकारने सांगितले. यात एक लाख मेगावॅट वीज सौर ऊर्जा असेल.
By admin | Published: July 7, 2015 10:44 PM2015-07-07T22:44:21+5:302015-07-07T22:44:21+5:30