विजयवाडा : चॉकलेट विक्रेता सी. किशोर लाल (३०) याच्याकडे आयकर विभागाने बँक खात्यातील व्यवहारांचा खुलासा मागितला आहे. लाल याने कोट्यवधी रुपये साठवून ठेवल्याचा आयकर विभागाचा संशय आहे. विजयवाडा येथे लाल चॉकलेट विकायचा. त्याला आयकर विभागाने २५ मे रोजी बजावलेल्या नोटिसीमध्ये बँक खात्यातील प्रचंड आर्थिक व्यवहारांचा खुलासा मागितला आहे. किशोर लाल दारोदार फिरून चॉकलेट विकतो. माल ठेवण्यासाठी त्याच्याकडे छोटीशी जागाही आहे. त्याचे रोजचे उत्पन्न त्याच्या बँक खात्यातील १८ कोटी १४ लाख ९८ हजार ८१५ रुपये बघितल्यावर क्षुल्लकच वाटावे. त्याने नुकतेच रेणुकामाता मल्टिस्टेट को-आॅपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये खाते उघडले. अहमदाबादेतील या बँकेने विजयवाड्यात नुकतीच शाखा सुरू केली. या बँकेत वन टाउन एरियातील शेकडो विक्रेत्यांनी खाते सुरू केले. गेल्या काही महिन्यांत किशोर लालच्या खात्यात १८ कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे आढळले.
चॉकलेट विक्रेत्याकडे निघाले १८ कोटी
चॉकलेट विक्रेता सी. किशोर लाल (३०) याच्याकडे आयकर विभागाने बँक खात्यातील व्यवहारांचा खुलासा मागितला आहे
By admin | Published: June 5, 2017 12:23 AM2017-06-05T00:23:58+5:302017-06-05T00:23:58+5:30