Join us

थेट विक्रीमधून निर्माण होणार १.८ कोटी रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 5:51 AM

कोणताही वितरक, दुकानदार आणि कोणत्याही एजन्सीशिवाय चालणाऱ्या, म्हणजेच थेट कंपनी ते विक्रेता यांच्या माध्यमातून...

मुंबई : कोणताही वितरक, दुकानदार आणि कोणत्याही एजन्सीशिवाय चालणाऱ्या, म्हणजेच थेट कंपनी ते विक्रेता यांच्या माध्यमातून चालणाºया थेट विक्री व्यवसायामुळे येत्या ८ वर्षांमध्ये १.८ कोटी रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.एखाद्या कंपनीचे उत्पादने थेट कंपनीतून मागवून विकायचे, असे या व्यवसायाचे स्वरूप आहे. हा व्यवसाय गृहिणीही उत्तमरीत्या करू शकतात. त्यामुळे हे क्षेत्र भारतात वेगाने वाढत आहे. डायरेक्ट सेलिंग उद्योग २०२५ पर्यंत ६५ हजार कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भारतात याच पद्धतीने व्यवसाय करणाºया अ‍ॅम्वे इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू बुधराजा यांनी सांगितले की, भारतातील थेट विक्री व्यवसायाची बाजारपेठ आज ८,४०० कोटी रुपयांची आहे. पुढील ५ वर्षांत ती आणखी वेगाने वाढेल. महिलांना यात मोठ्या प्रमाणात व्यवसायाची संधी मिळणार असून, असल्याचेही बुधराजा यांनी सांगितले.

टॅग्स :कर्मचारीनोकरी