Join us

ओपन पार्किंगवर १८% GST; कार खरेदी करणं नाही, तर उभी करण्यासाठी खिसा करावा लागणार रिकामा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 12:13 PM

घर खरेदी करणाऱ्यांसाठी कार पार्किंगचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे.

घर खरेदी करणाऱ्यांसाठी कार पार्किंगचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे. जेव्हा कोणी घर विकत घेते तेव्हा बिल्डर्स ओपन आणि स्टिल्ट कार पार्किंगसाठी वेग वेगळं शुल्क आकारतात. तुम्ही जर फ्लॅट खरेदीदार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. फ्लॅट खरेदी करणाऱ्यांसाठी झटका देणारी बातमी आहे. एएएआरच्या पश्चिम बंगाल खंडपीठानं याचिकेवर सुनावणी करताना पूर्वीचा निर्णय कायम ठेवला.

कार पार्किंग विकण्याचा किंवा वापरण्याचा अधिकार बंडल करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्याला कंपोझिट सप्लाय म्हणता येणार नाही. यावर अशावेळी त्यावर जीएसटी लागला पाहिजे. वास्तविक एएएआरचा निर्णय ईडन रिअल इस्टेटच्या अपीलवर आला आहे. म्हणजे घर खरेदी करणं तुमच्यासाठी अधिक महाग होईल. कार पार्किंगवरील जीएसटीचा अधिक बोजा फ्लॅट खरेदीदारांवर पडणार आहे.

एप्रिल २०१९ पासून, इनपुट टॅक्स क्रेडिटशिवाय नॉन-अफोर्डेबल हाऊसिंग प्रोजेक्टवर ५ टक्के CST आकारला जात होता. परंतु आतापासून सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांवर, बिल्डरला १२ टक्के जीएसटी इनपुट क्रेडिटसह जुन्या जीएसटी दरानं पैसे देण्याचा पर्याय असेल. म्हणजेच, इनपुटवर भरलेला कर बंद केला जाऊ शकतो. या निर्णयानंतर फ्लॅट खरेदी करणाऱ्यांवरील बोजा आणखी वाढणार आहे. अशा परिस्थितीत लोक एकतर कार पार्किंगशिवाय फ्लॅट खरेदी करतील किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजतील. पार्किंगशिवाय फ्लॅट खरेदी केल्यास आणखी अडचणी निर्माण होतील.

टॅग्स :कारसुंदर गृहनियोजन