Lokmat Money > बिझनेस न्यूज > १८०६ : कोलगेट आणि डेन्टल पावडर

१८०६ : कोलगेट आणि डेन्टल पावडर

सोबतची जाहिरात सप्टेंबर १९०६ मध्ये कोलगेटचे शतकी वर्ष साजरे करताना अमेरिकेतल्या दी डिलीनिएटर या मासिकात प्रकाशित झाली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 12:36 PM2023-05-27T12:36:25+5:302023-05-27T12:36:39+5:30

सोबतची जाहिरात सप्टेंबर १९०६ मध्ये कोलगेटचे शतकी वर्ष साजरे करताना अमेरिकेतल्या दी डिलीनिएटर या मासिकात प्रकाशित झाली होती.

1806: Colgate and dental powder | १८०६ : कोलगेट आणि डेन्टल पावडर

१८०६ : कोलगेट आणि डेन्टल पावडर

१८०६ साली न्यूयॉर्कमध्ये विल्यम कोलगेटने स्टार्च आणि साबण बनविणारा कारखाना काढला आणि त्याबरोबर सुरू झालेल्या कोलगेटने पुढच्या दीड-दोनशे वर्षांत जगभरात आपले साम्राज्य निर्माण केले. आज कोलगेट मुख्यतः टूथपेस्टसाठी ओळखली जाते; पण, सुरुवातीच्या काळात साधा आणि सुगंधी साबण, टाल्कम पावडर, वेगवेगळ्या प्रकारची अत्तरे व सेंटस यासाठी कोलगेट ओळखली जात असे. १८७२ मध्ये कोलगेट हा ब्रँड रजिस्टर झाला तो Cashmere Bouquet.. म्हणजेच काश्मिरी पुष्पगुच्छ या सुगंधी साबणासाठी. त्यामुळे कोलगेटच्या सुरुवातीच्या जाहिराती सुगंधी अत्तरे, सेंट्स आणि साबणासाठीच्या आहेत. 

सोबतची जाहिरात सप्टेंबर १९०६ मध्ये कोलगेटचे शतकी वर्ष साजरे करताना अमेरिकेतल्या दी डिलीनिएटर या मासिकात प्रकाशित झाली होती. कोलगेटचे शतक साजरे करण्यासाठी अँटिसेप्टिक डेंटल पावडरीसोबत Cashmere Bouquet मोफत देण्याची योजना जाहीर करण्यात आली त्याची ही जाहिरात आहे. १८७३ पासून कोलगेटने एका लहानशा बाटलीमध्ये आपली अँटिसेप्टिक डेंटल पावडर विक्रीसाठी बाजारात आणली होती. कोलगेटने १८६९ मध्ये Cashmere Bouquet साबण विकसित केला होता; आणि १८७० पासून त्याची जाहिरात करण्यास सुरुवात केली. १८७२ मध्ये कोलगेट Cashmere Bouquet हे नाव ट्रेडमार्क केले गेले.

Cashmere Bouquet चा प्रत्येक साबण स्वतंत्रपणे कागदात गुंडाळलेला होता आणि मेणाने सीलबंद करण्यात आला होता.  त्या साबणाच्या आधाराने अँटिसेप्टिक डेंटल पावडर विकण्याची ही योजना आहे. कोलगेटच्या अँटिसेप्टिक डेन्टल पावडरच्या बाटलीवरचा मजकूरदेखील खूप गमतीदार आहे. “दात स्वच्छ आणि पांढरेशुभ्र बनविण्यासाठी या पावडरमध्ये आघाडीच्या दंतरोगतज्ज्ञांच्या आणि दंतशास्त्राचे शिक्षण देणाऱ्या आघाडीच्या महाविद्यालयातल्या प्राध्यापकांच्या शिफारशीनुसार कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम आणि साबण यांच्या मिश्रणाचा समावेश केलेला आहे.” अशी खास माहिती त्या बाटलीवर दिलेली सापडते. 

आपले उत्पादन शास्त्रीय संशोधनाच्या आणि अभ्यासाच्या पायावर आधारलेले आहे, हे सांगण्यासाठी आजदेखील दंततज्ज्ञांचा हवाला दिला जात असतोच.
काळाच्या ओघात टूथपेस्टच्या जाहिराती बदलल्या असल्या, तरी तज्ज्ञांच्या शिफारशी वापरण्याच्या पद्धतीमध्ये मात्र अजून फारसा फरक झालेला नाही.

Web Title: 1806: Colgate and dental powder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.