Join us

मोबाइलने पाठवले १८.२० लाख कोटी; यूपीआय पेमेंटमध्ये फेब्रुवारीत १२२ कोटी व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 1:39 PM

डिजिटल पेमेंटला केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिल्याने दर महिन्याला होणाऱ्या यूनिफाईट पेमेंट इंटरफेसद्वारे (यूपीआय) होणाऱ्या व्यवहारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटला केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिल्याने दर महिन्याला होणाऱ्या यूनिफाईट पेमेंट इंटरफेसद्वारे (यूपीआय) होणाऱ्या व्यवहारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

एकट्या फेब्रुवारी महिन्यात देशभरात १८.२० लाख कोटी रुपयांचे व्यवहार करण्यात आले. या महिनाभरात एकूण १२२ कोटी व्यवहार यूपीआयद्वारे करण्यात आले.  एनपीसीआयच्या वतीने ही माहिती देण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या यूपीआय व्यवहारांचे प्रमाण जानेवारी २०२४ तुलनेत कमी होते. 

जानेवारीत १२१ कोटी व्यवहारांच्या माध्यमातून १८.४० लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. दररोज यूपीआच्या माध्यमातून सरासरी ४० ते ८० हजार कोटी रुपयांचे व्यवहार केले जातात. जगभरात होणाऱ्या एकूण  ऑनलाइन बँकिंग व्यवहारांपैकी ४६ व्यवहार एकट्या भारतात होतात. 

या काळात एनईएफटी आणि आरटीजीएसच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात ऑनलाइन पेमेंट करण्यात आली आहेत.

आर्थिक व्यवहारांचे प्रमाण किती?

प्रकार    एकूण रक्कम

  • आरटीजीएस    १४६ लाख कोटी
  • इंटरनेट बँकिंग    ९१.२४ लाख कोटी
  • एनईएफटी    ३३.८५ लाख कोटी
  • मोबाइल बँकिग    २८.१६ लाख कोटी
  • यूपीआय    १८.४० लाख कोटी

 

  • १२ वर्षांत ९०% वाढ

भारतातील किरकोळ डिजिटल पेमेंट आर्थिक वर्ष २०१२-१३ मध्ये १६२ कोटी इतके होते. फ्रेबुवारी २०२३०२४ दरम्यान याद्वारे हा व्यवहार १४,,७२६ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. गेल्या १२ वर्षात यात जवळपास ९० टक्के वाढ झाली आहे. 

टॅग्स :ऑनलाइन