Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीडीपीचा तिसरा हिस्सा १८५ अब्जाधीशांकडेच, एकूण संपत्ती ९९.८६ लाख कोटींच्या घरात

जीडीपीचा तिसरा हिस्सा १८५ अब्जाधीशांकडेच, एकूण संपत्ती ९९.८६ लाख कोटींच्या घरात

GDP News: १ अब्ज डाॅलरपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या भारतीय अतिश्रीमंतांची संख्या यंदा वाढून १८५ इतकी झाली असून, त्यांच्या ताब्यातील संपत्ती भारताच्या नामधारी सकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३३.८१ टक्के आहे. फॉर्च्यून इंडियाने जारी केलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 10:41 AM2024-09-04T10:41:47+5:302024-09-04T10:42:07+5:30

GDP News: १ अब्ज डाॅलरपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या भारतीय अतिश्रीमंतांची संख्या यंदा वाढून १८५ इतकी झाली असून, त्यांच्या ताब्यातील संपत्ती भारताच्या नामधारी सकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३३.८१ टक्के आहे. फॉर्च्यून इंडियाने जारी केलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 

185 billionaires own the third share of the GDP, with a total wealth of 99.86 lakh crores | जीडीपीचा तिसरा हिस्सा १८५ अब्जाधीशांकडेच, एकूण संपत्ती ९९.८६ लाख कोटींच्या घरात

जीडीपीचा तिसरा हिस्सा १८५ अब्जाधीशांकडेच, एकूण संपत्ती ९९.८६ लाख कोटींच्या घरात

 नवी दिल्ली  - १ अब्ज डाॅलरपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या भारतीय अतिश्रीमंतांची संख्या यंदा वाढून १८५ इतकी झाली असून, त्यांच्या ताब्यातील संपत्ती भारताच्या नामधारी सकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३३.८१ टक्के आहे. फॉर्च्यून इंडियाने जारी केलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 

१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या अतिश्रीमंतांसाठी अहवालात ‘डॉलर अब्जाधीश’ अशी संज्ञा वापरण्यात आली आहे. अहवालानुसार, भारतातील अतिश्रीमंत व्यक्तींची संपत्ती १ लाख कोटी डॉलरचा टप्पा ओलांडून १.१९ लाख कोटी डॉलरवर (सुमारे ९९.८६ लाख कोटी रुपये) पोहोचली आहे. 

‘फॉर्च्यून इंडिया वाॅटरफिल्ड ॲडवायझर्स २०२४’च्या  रँकिंगनुसार   २०२२ मध्ये भारतातील अब्जाधीशांची संख्या १४२ होती. जागतिक अर्थव्यवस्थेत अनेक आव्हाने असताना तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया ५ टक्के घसरलेला असताना भारतीयांच्या संपत्तीत उल्लेखनीय वाढ झाली आहे. यंदा अब्जाधीशांच्या यादीत २९ नवीन लोक दाखल झाले आहेत. नवीन अब्जाधीश एफएमसीजी, औषधी आणि आयटी यांसह विविध क्षेत्रांतील आहेत. त्यांनी एकत्रितरीत्या ४.०९ लाख कोटींची संपत्ती अर्जित केली. 

टॉप-१० श्रीमंतांमध्ये एकमेव महिला 
फॉर्च्युन इंडियाच्या यादीत रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी हे १०.५ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह पहिल्या स्थानावर आहेत. दुसऱ्या स्थानी अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी आहेत. त्यांची संपत्ती १०.४ लाख कोटी रुपये आहे. अब्जाधीशांच्या यादीत टॉप-१० मध्ये जिंदाल परिवाराच्या प्रमुख सावित्रीदेवी जिंदाल या एकमेव महिला आहेत. 

Web Title: 185 billionaires own the third share of the GDP, with a total wealth of 99.86 lakh crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.