नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीतून केंद्र सरकारचे ऑक्टोबरमधील एकूण संकलन ९ टक्के वाढून १.८७ लाख कोटींवर पोहोचले आहे. घरगुती बाजारात देवाणघेवाण वाढवल्याने जीएसटी संकलन वाढले आहे, शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीवरून दिसून येते.
मागच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये एकूण जीएसटी संकलन ८.९ टक्के वाढून १.८७ लाख कोटींवर पोहोचले होते. तर मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हेच संकलन १.७२ लाख कोटी इतके झाले होते. ऑक्टोबर महिन्यात केंद्रीय जीएसटी संकलन ३३,८२१ कोटी रुपये इतके झाले. तर राज्य जीएसटी संकलन ४१,८६४ कोटी इतके झाले. एकीकृत जीएसटी संकलन ९९,१११ कोटी रुपये इतके झाले.