Lokmat Money > बिझनेस न्यूज > १.९ लाख होंडा मोटारी कंपनीने परत मागविल्या

१.९ लाख होंडा मोटारी कंपनीने परत मागविल्या

सध्या जगभर चर्चेचा विषय झालेल्या सदोष तकाटा एअरबॅगवरून होंडा कंपनीने भारतात याआधी विकलेल्या सिटी, झाज, अ‍ॅकॉर्ड, सिव्हिक आणि सीआर-व्ही

By admin | Published: July 15, 2016 02:52 AM2016-07-15T02:52:19+5:302016-07-15T02:52:19+5:30

सध्या जगभर चर्चेचा विषय झालेल्या सदोष तकाटा एअरबॅगवरून होंडा कंपनीने भारतात याआधी विकलेल्या सिटी, झाज, अ‍ॅकॉर्ड, सिव्हिक आणि सीआर-व्ही

1.9 lakhs of Honda cars have been recalled by the company | १.९ लाख होंडा मोटारी कंपनीने परत मागविल्या

१.९ लाख होंडा मोटारी कंपनीने परत मागविल्या

नवी दिल्ली : सध्या जगभर चर्चेचा विषय झालेल्या सदोष तकाटा एअरबॅगवरून होंडा कंपनीने भारतात याआधी विकलेल्या सिटी, झाज, अ‍ॅकॉर्ड, सिव्हिक आणि सीआर-व्ही या मॉडेलच्या १.९ लाख मोटारी दुरुस्ती करून देण्यासाठी ग्राहकांकडून परत मागविण्याचे गुरुवारी जाहीर केले.
कंपनीने खबरदारीचा उपाय म्हणून जगभर हाती घेतलेल्या कार्यक्रमाचाच हा भाग असून यात ग्राहकांना त्यांच्या मोेटारीतील तकाटा एअरबॅग मोफत बदलून दिली जाईल, असे होंडा मोटर्स इंडिया कंपनीने एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले. सीआर-व्ही आणि सिव्हिक या गाड्यांमधील सदोष एअरबॅग कंपनीच्या देशभरातील डीलरकडून लगेच बदलून मिळतील. इतर मॉडेल्सचे हे काम सप्टेंबरपासून सुरु केले जाईल व त्याची माहिती ग्राहकांना थेट कळविली जाईल. आपल्या गाडीतील तकाटा एअरबॅग बदलून घेण्याची गरज आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी ग्राहकांनी त्यांच्या मोटारीचा १७ आकडी ‘व्हीआयएन’ नंबर कळवावा, असे कंपनीने म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: 1.9 lakhs of Honda cars have been recalled by the company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.