Join us

खासगी इंटरनेट कंपन्यांनी उभारले २ अब्ज डॉलर

By admin | Published: March 30, 2017 12:59 AM

सूचीबद्ध नसलेल्या खाजगी इंटरनेट कंपन्यांनी खाजगी निधीद्वारे २0१७ च्या पहिल्या तिमाहीत २ अब्ज डॉलरचे भांडवल उभारले.

नवी दिल्ली : सूचीबद्ध नसलेल्या खाजगी इंटरनेट कंपन्यांनी खाजगी निधीद्वारे २0१७ च्या पहिल्या तिमाहीत २ अब्ज डॉलरचे भांडवल उभारले. गुंतवणूक बँकिंग संस्था जेफेरीजने ही माहिती दिली. नोटाबंदीनंतर फीन-टेक कंपन्यांमधील भांडवली गुंतवणूक वाढली असल्याचेही संस्थेने नमूद केले आहे. जेफेरीजने जारी केलेल्या अहवालात म्हटले की, २0१६ मध्ये एकूण २0७ अब्ज डॉलरचा निधी उभारण्यात कंपन्यांना यश आले होते. यंदा त्यात वाढ झाली आहे. यंदाच्या पहिल्या तिमाहीतच २ अब्ज डॉलर उभे राहिले. ही दुसऱ्या क्रमांकाची मोठी रक्कम ठरली आहे. २0१५ च्या तिसऱ्या तिमाहीत आजपर्यंतची सर्वाधिक रक्कम उभी राहिली आहे.अहवालात म्हटले आहे की, फ्लिपकार्टने १ अब्ज डॉलर, तर ओलाने ३३0 दशलक्ष डॉलर उभे केले. एकूण निधीत या दोन्ही कंपन्यांचा हिस्सा ६५ टक्के आहे. याशिवाय पेटीएम मॉलने (ई-टेलिंग) २00 दशलक्ष डॉलर, डेलिव्हेरी (ई-टेलिंग लॉजिस्टिक्स) १00 दशलक्ष, फ्रीचार्ज (फिन-टेक) ५७ दशलक्ष, कारड्रेड (क्लासिफाईड) ५५ दशलक्ष आणि पार्क्टोने (आरोग्य सेवा) ५५ दशलक्ष डॉलर उभे केले. अहवालात म्हटले आहे की, या तिमाहीत चार फीन-टेक कंपन्यांनी १00 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त निधी उभा केला. फ्रीचार्ज (पेमेंटस्), सीसीअ‍ॅव्हेन्यूज (पेमेंट), ट्रूबॅलन्स (मोबाईल रिचार्ज) आणि क्रेडिटमंत्री (क्रेडिट अ‍ॅनॅलिसिज) या कंपन्यांचा त्यात समावेश आहे. ई-टेलिंग क्षेत्रात अधिक मजबुती अपेक्षित आहे.अहवालात म्हटले की, अलिबाबा आणि सैफ पार्टनर्स पेटीएम मॉलमध्ये २00 दशलक्ष डॉलर गुंतवीत आहेत. भारतात ई-टेलिंग क्षेत्रात आता पाच मोठ्या कंपन्या आहेत. फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील, शोक्ल्यूज आणि पेटीएम यांचा त्यात समावेश आहे.