Join us  

२ लाख किलोमीटरचे महामार्ग

By admin | Published: November 11, 2016 4:04 AM

भारताच्या सर्व भागांना जोडणारे २ लाख किमीचे रुंद राष्ट्रीय महामार्ग, देशातल्या १११ नद्यांमधे सुलभ व स्वस्त जलवाहतूक, सागरमालासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी १२

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीभारताच्या सर्व भागांना जोडणारे २ लाख किमीचे रुंद राष्ट्रीय महामार्ग, देशातल्या १११ नद्यांमधे सुलभ व स्वस्त जलवाहतूक, सागरमालासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी १२ लाख कोटींची गुंतवणूक आणि ५ कोटी तरुणांना नवे रोजगार हे केंद्रीय भूतल परिवहन व नौकानयन मंत्रालयाचे स्वप्न आहे. त्या दिशेने वेगाने काम करायला आमच्या दोन्ही मंत्रालयांनी प्रारंभ केला आहे. दररोज २२ किमीचे महामार्ग देशात तयार होत आहेत. नवी बंदरे, रेल्वे व बंदरांची कनेक्टिविटी, जलमार्गांची निर्मिती अशा अनेक योजना सुरू आहेत.महामार्गांसाठी ४ लाख कोटी, जलवाहतुकीसाठी ८0 हजार कोटी आणि सागरमाला प्रकल्पासाठी १२ लाख कोटींची कामे नियोजित असून, अनेक कामांचा प्रारंभही झाला आहे. ठरलेल्या वेळेनुसार सारेकाही झाले तर देशातली ८0 टक्के सुरक्षित वाहतूक हिरव्यागार देखण्या राष्ट्रीय महामार्गांवरून सुरू होईल, असे प्रतिपादन भूपृष्ठ परिवहन व नौकानयन मंत्री नितीन गडकरींनी केले. ते अर्थविषयक संपादकांच्या परिषदेत बोलत होते. आमच्या काळात रस्त्यांवरील अपघाताचे प्रमाण ४ टक्के वाढले, हे मान्य करताना गडकरी म्हणाले, दरवर्षी ५ लाख अपघात होतात. ही बाब चिंताजनक आहे, त्यासाठी मोटर वाहन कायद्यात बदल करण्याचा निर्णय गतवर्षीच घेतला आहे. सध्या हे विधेयक संसदेच्या चिकित्सा समितीकडे आहे. या अधिवेशनात ते अंतत: मंजूर होईल. मुंबईच्या जवाहरलाल नेहरू बंदरासह देशातल्या अन्य बंदरांवरही मालवाहतुकीचे प्रमाण वाढल्यामुळे रस्त्यांवरील ट्रक्स व ट्रेलरची वाहतूक रेल्वेमार्गे लवकर वळवण्याचा विचार सुरू आहे. दिल्ली-मुंबई फ्रेट कॉरिडॉरला वेग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कसारा घाटातून थेट नेहरू बंदरापर्यंत माल वाहतूक वळवण्याचा प्रयोग करतो आहोत.