Lokmat Money > बिझनेस न्यूज > DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ, आठव्या वेतन आयोगापूर्वी सरकारकडून मोठं गिफ्ट

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ, आठव्या वेतन आयोगापूर्वी सरकारकडून मोठं गिफ्ट

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगापूर्वीच सरकारनं कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिलंय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 15:23 IST2025-03-28T15:22:18+5:302025-03-28T15:23:13+5:30

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगापूर्वीच सरकारनं कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिलंय.

2 percent DA hike of central employees announced big gift from narendra modi government before 8th Pay Commission | DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ, आठव्या वेतन आयोगापूर्वी सरकारकडून मोठं गिफ्ट

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ, आठव्या वेतन आयोगापूर्वी सरकारकडून मोठं गिफ्ट

7th pay commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं शुक्रवारी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) २ टक्क्यांच्या वाढीला मंजुरी दिली. या दुरुस्तीमुळे डीए ५३% वरून ५५% होईल. ही वाढ सातव्या वेतन आयोगाअंतर्गत झाली आहे. सरकारनं आठवा वेतन आयोगही स्थापन केला आहे. नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता आहे.

वर्षातून दोनदा होते वाढ

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये वर्षातून दोनवेळा वाढ केली जाते. ही वाढ सहामाही तत्त्वावर होते. यापूर्वी जुलै २०२४ मध्ये महागाई भत्ता ५० टक्क्यांवरून ५३ टक्के करण्यात आला होता. यात ३ टक्के वाढ झाली होती. आता नव्या निर्णयानुसार भत्त्यात २ टक्के वाढ करण्यात आली आहे. ही वाढ जानेवारी २०२५ ते जून २०२५ पर्यंत आहे.

UPI ट्रान्झॅक्शनवर फी? जनता म्हणाली, "वापरच बंद करू"; युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, काय आहे प्रकरण?

दोन महिन्यांची थकबाकी मिळणार

सरकारनं मार्च महिन्यात भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. मात्र, केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे भत्तेही थकबाकी म्हणून मिळणार आहेत. नव्या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होईल, हे गणितावरून समजून घेऊया.

जर केंद्रीय कर्मचाऱ्याचं मूळ वेतन १९,००० रुपये असेल तर त्या कर्मचाऱ्याला १०,०७० रुपये महागाई भत्ता मिळत बोका. आता २ टक्के वाढीनंतर हा भत्ता १०,४५० रुपये होईल. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात ३८० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

Web Title: 2 percent DA hike of central employees announced big gift from narendra modi government before 8th Pay Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.