Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयटीआरसाठी हवी २ आठवड्यांची मुदतवाढ; अतिवृष्टी, भूस्खलन, इतर संकटांचा फटका

आयटीआरसाठी हवी २ आठवड्यांची मुदतवाढ; अतिवृष्टी, भूस्खलन, इतर संकटांचा फटका

आयकर विवरण करण्याची मुदत लवकरच संपणार आहे. आतापर्यंत ५ काेटींपेक्षा जास्त लाेकांनी आयकर विवरण भरले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 09:44 AM2023-07-29T09:44:32+5:302023-07-29T09:44:46+5:30

आयकर विवरण करण्याची मुदत लवकरच संपणार आहे. आतापर्यंत ५ काेटींपेक्षा जास्त लाेकांनी आयकर विवरण भरले आहे.

2 week extension required for ITR; Hit by heavy rains, landslides, other calamities | आयटीआरसाठी हवी २ आठवड्यांची मुदतवाढ; अतिवृष्टी, भूस्खलन, इतर संकटांचा फटका

आयटीआरसाठी हवी २ आठवड्यांची मुदतवाढ; अतिवृष्टी, भूस्खलन, इतर संकटांचा फटका

नवी दिल्ली : आयकर विवरण करण्याची मुदत लवकरच संपणार आहे. आतापर्यंत ५ काेटींपेक्षा जास्त लाेकांनी आयकर विवरण भरले आहे. मात्र, अजूनही सुमारे २७ टक्के करदात्यांनी विवरण दाखल केलेले नसून त्यापैकी १४ टक्के लाेकांची डेडलाइन हुकण्याची शक्यता जास्त आहे. काही राज्यांमध्ये अतिवृष्टीचा तडाखा, नैसर्गिक संकटांचा या लाेकांना फटका बसू शकताे.

‘लाेकल सर्कल्स’ने एक सर्वेक्षण  केले आहे. त्यानुसार, लाेकांना किमान २ आठवड्यांची मुदतवाढ हवी आहे. सात-आठ राज्यांना अतिवृष्टी, भूस्खलन इत्यादी नैसर्गिक संकटांमुळे फटका बसला आहे. या भागांपुरती मुदतवाढ देण्याचा विचार करावा, अशी येथील लाेकांची अपेक्षा आहे. 

पाच काेटी आयटीआर दाखल 

२७ जुलै राेजी ५ काेटी आयटीआरचा टप्पा गाठला. त्यापैकी ८८ टक्के आयटीआरचे ई-व्हेरिफिकेशन झाले असून २.६९ विवरणांवर कार्यवाही झाली आहे. 

क्रिप्टाेतील कमाई कशी दाखवाल?

 क्रिप्टाेमधील व्यवहारांवर ३० टक्के कॅपिटल गेन कर द्यावा लागताे, तसेच  त्यावर १% टीडीएस लागू हाेताे. 
 आयटीआर दाखल करताना क्रिप्टाेद्वारे मिळालेले सर्व प्रकारचे उत्पन्न नमूद करा. 
 यासंदर्भात बरीच अस्पष्टता आहे. अशावेळी आयटीआर दाखल करताना व्यावसायिकांची मदत घ्यावी लागू शकते.

 उदाहरणार्थ, दाेन वर्षांपूर्वी १० हजार रुपयांची क्रिप्टाेकरन्सी खरेदी केली. २०२२ मध्ये ती ५० हजार रुपयांना विकली. अशावेळी ४० हजार रुपयांचा नफा झालेला आहे. 

हा संपूर्ण नफा आयटीआर भरताना नाेंदविणे आवश्यक आहे. 
५%लाेकांना विवरण दाखल करताना अडचणी.
३२% ३१ जुलैपर्यंत करदात्यांना विवरण दाखल करणे अशक्य आहे.

Web Title: 2 week extension required for ITR; Hit by heavy rains, landslides, other calamities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Taxकर