Join us

घरबांधणी उद्योगातील संकटामुळे बँकांचे २० अब्ज डॉलर अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 1:42 AM

विक्री नीचांकी पातळीवर; कर्जवसुली मोठ्या प्रमाणात थंडावली

नवी दिल्ली : भारतातील घरबांधणी उद्योग संकटात सापडल्यामुळे बँकांचे २0 अब्ज डॉलरचे कर्ज अडकून पडले आहे. घरांची विक्री दशकातील नीचांकी पातळीवर गेल्यामुळे कर्जवसुली थंडावली आहे.कोटक इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजर्सचे व्यवस्थापकीय संचालक एस. श्रीनिवासन म्हणाले की, थकबाकी वसूल करण्यासाठी बँका भूखंड, गृहप्रकल्पांचा ताबा घेत आहेत. कर्जासह त्यांचीही बँकांना विक्री करीत आहेत. गेल्या चार वर्षांत घरांची विक्री ४0 टक्क्यांनी तर किमती २0 टक्क्यांनी घसरल्या आहेत. नाईट फ्रँक संस्थेच्या अहवालात म्हटले आहे की, २0१८ मध्ये देशातील सर्व मोठ्या शहरांतील निवासी मालमत्तांच्या किमती घसरल्या आहेत.संस्थेचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल म्हणाले की, पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत. महागाईही वाढत आहे. त्यामुळे व्याजदरांत वाढीचा धोका घरबांधणी उद्योगासमोर राहील.इंडिया बुल्स रिकन्स्ट्रक्शन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण शिंगवेकर म्हणाले की, सध्या भूखंडांची उपलब्धता गरजेपेक्षा अधिक झालेली आहे. त्यामुळे किमती घसरल्या आहेत. आमच्या कंपनीने ४ अब्ज रुपयांचे गृहकर्ज बँकांकडून याआधीच घेतले आहे.

टॅग्स :बांधकाम उद्योगबँकिंग क्षेत्र