मुंबई - पैशाची योग्य गुंतवणूक ही भविष्यातील मोठ्या खर्चापासून दिलासा देणारी बाब असते. त्यामुळेच, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठीच्या खर्चीक बाबींचा अगोदरपासूनच प्लॅन करावा लागतो. त्यासाठी, आपण पोस्टात आरडी किंवा एलआयसीच्या योजना घेत असतो. मात्र, सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात रिटर्न्स देणाऱ्या इतरही योजना आहेत. गुंतवणुकीची सुरूवात करताना विलंब होता कामा नये, असा सल्ला जाणकारांकडून दिला जातो.
योग्यवेळी गुंतवणूक केली पाहिजे आणि त्यामध्ये काळानुसार वाढही झाली पाहिजे. सध्या, म्युच्युअल फंड आणि एसआयपीमधील गुंतवणूक फायदेशीर मानली जाते.
SIP मधील गुंतवणूक
जर तुम्हाला अधिक रिटर्न्स पाहिजे असतील तर (एसआयपी) म्हणजेच सिस्टीमेटीक इंन्व्हेस्टमेंट प्लॅन चांगला पर्याय आहे. एसआयपीच्या माध्यमातून आपण काही वर्षातच चांगला रिटर्न्स मिळवू शकता. त्यामध्ये, महिन्याला कमीत कमी 500 रुपयांचीही गुंतवणूक करण्यात येऊ शकते.
1000 रुपयांची गुंतवणूक देईल 20 लाख
फ्रेंकलिन टेपलटन ऑफ इंडिया या वेबसाइटवर देण्यात आलेल्या कॅल्क्युलेशन अनुसार, जर तुम्ही प्रत्येक महिन्याला 1000 रुपयांची गुंतवणूक कराला तर 20 वर्षांनंतर तुम्हाला 20 लाख रुपयांपर्यंतचा रिटर्न्स मिळू शकेल. जवळपास 12 टक्के वार्षिक व्याजदराने ही रक्कम होते.
7 वर्षांत बनवा 50 लाख रुपये
7 वर्षांच्या गुंतवणुकीत तुम्हाला 50 लाख रुपये फंड जमा करायचा असल्यास तुम्हाला दरमहा 40 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. ही आकडेवाडी जवळपास 12 टक्के सीएजीआर रिटर्न्सच्या अनुसार आहे. इक्विटी जादा काळासाठी चांगला रिटर्न्स देते. मात्र, 100 रुपयांपासूनची गुंतवणूकही करता येते. मात्र, एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करायची असल्यास तुम्हाला किमान 500 रुपयाची गुंतवणूक करावी लागते. नियमितपणे दरमहा ही रक्कम भरल्यास 20 वर्षांनी तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंत रिटर्न्स मिळतील.