Lokmat Money > बिझनेस न्यूज > ३ दिवसांत २० हजार काेटी गमावले

३ दिवसांत २० हजार काेटी गमावले

आपटले पेटीएमचे शेअर्स, कर्मचारीही दुसऱ्या नाेकरीच्या शाेधात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 05:55 AM2024-02-06T05:55:39+5:302024-02-06T05:56:07+5:30

आपटले पेटीएमचे शेअर्स, कर्मचारीही दुसऱ्या नाेकरीच्या शाेधात

20 thousand crores lost in 3 days | ३ दिवसांत २० हजार काेटी गमावले

३ दिवसांत २० हजार काेटी गमावले

लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आरबीआयने कारवाई केल्यानंतर ‘पेटीएम’चा शेअर तीन सत्रांमध्ये ४२ टक्क्यांनी काेसळला आहे. शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आला असून, गुंतवणूकदारांनी तीन दिवसांत जवळपास २० हजार ५०० काेटी रुपये गमाविले आहेत. दुसरीकडे पेटीएमचे ग्राहक आणि व्यापारी इतर पर्यायांकडे वळू लागले असून, आता कंपनीतील कर्मचारीही नवी नाेकरी शाेधू लागले आहेत.

१ फेब्रुवारीपासून पेटीएमचा शेअर ७६१ रुपयांवरून ३२३ रुपयांनी घसरला आहे. सलग तिसऱ्या दिवशी शेअरमध्ये लाेअर सर्किट लागले.  आरबीआयने निर्बंध घातल्यामुळे गुंतवणूकदारांनी कंपनीचे शेअर्स विकण्याचा सपाटा लावला आहे. 

कर्मचारी नव्या नाेकऱ्यांच्या शाेधात
nआरबीआयने दणका दिल्यानंतर आता कंपनीतील कर्मचारी नवी नाेकरी शाेधू लागले आहेत. तंत्रज्ञांसह मर्चंट बँकिंग तसेच विपणन विभागातील कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. 
nयासंदर्भात एक अहवाल सादर झाला आहे. कंपनीने सध्या काेणालाही कामावरून काढणार नसल्याचे म्हटले, तरी कर्मचारी सुरक्षित पर्याय शाेधू लागले आहेत.

ईडी चाैकशीचा कंपनीकडून इन्कार कंपनीचे संस्थापक, सीईओ आणि कंपनीवर ईडीने कारवाई केलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. काही युझर्स आणि मर्चंट्स तपासाच्या कक्षेत असून त्यांची चाैकशी करण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

३१  काेटी ई-वाॅलेट्स निष्क्रिय करण्यात आले आहेत.

३ काेटी पेमेंट बँक खाती निष्क्रिय केली आहेत.

७२ टक्क्यांनी शेअर आतापर्यंत काेसळला आहे.

३५ हजार कर्मचारी कंपनीत आहेत.

१ हजार जणांना डिसेंबरमध्ये कामावरून काढले हाेते.

Web Title: 20 thousand crores lost in 3 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.