लंडन : रोल्स रॉयस मोटर कार कंपनीने तब्बल २०० कोटी रुपयांची बनविली असून ही बाजारातील सर्वांत महागड्या कारपैकी एक असणार
आहे.
असेही सांगितले जात आहे की, पॉपस्टारची जोडी बेयॉन्से आणि जे जेड यांनी या कारची बुकिंग केली आहे. सध्या अशा तीनच कार तयार करण्यात आल्या आहेत. रोल्स रॉयस मोटर कार्सचे सीईओ टॉर्स्टन मुलर ओटवोस यांनी सांगितले की, ही कार खास प्रकारे डिझाइन करण्यात आली आहे. कारचा मागील भाग फुलपाखरासारखा उघडतो. भटकंती करण्यासाठी बाहेर गेल्यानंतर अशा प्रकारे कार खुली करुन निसर्गाचा आनंद घेता येऊ शकतो.
या कारमध्ये व्ही १२ ट्विन टर्बा इंजिन आहे. श्रीमंत वर्गाला समोर ठेवून या कारची निर्मिती करण्यात आली आहे. ही महागडी कार बुलेटप्रूफ मात्र नाही. कारची डिझाइन अत्यंत आकर्षक आहे.