Lokmat Money > बिझनेस न्यूज > सर्वसामान्यांना मोठा दिलासा! घरगुती सिलिंडरच्या दरात 200 रुपयांची कपात

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! घरगुती सिलिंडरच्या दरात 200 रुपयांची कपात

200 rupees cut in lpg cylinder : गॅस सिलिंडरवर 200 रुपये, डिझेलवर 7 रुपये आणि पेट्रोलवर 9.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 07:43 PM2022-05-21T19:43:10+5:302022-05-21T20:08:08+5:30

200 rupees cut in lpg cylinder : गॅस सिलिंडरवर 200 रुपये, डिझेलवर 7 रुपये आणि पेट्रोलवर 9.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

200 rupees cut in lpg cylinder, petrol and diesel prices also reduced significantly | सर्वसामान्यांना मोठा दिलासा! घरगुती सिलिंडरच्या दरात 200 रुपयांची कपात

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! घरगुती सिलिंडरच्या दरात 200 रुपयांची कपात

नवी दिल्ली : सतत वाढणाऱ्या महागाईदरम्यान सर्वसामान्य जनतेसाठी केंद्र सरकारने अचानक मोठा दिलासा दिला आहे. एलपीजी गॅस सिलिंडर (LPG Cylinder Price), पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel prices) दरात मोठी कपात करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरवर 200 रुपये, डिझेलवर 7 रुपये आणि पेट्रोलवर 9.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी रात्रीपासून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती लागू होणार असल्याची घोषणा केली आहे. इंधनाच्या (पेट्रोल, डिझेल, गॅस) भाववाढीबाबत लोकांच्या सरकारकडे बऱ्याच दिवसांपासून तक्रारी होत्या. मात्र आता सरकारने या प्रकरणी मोठे पाऊल उचलत हा निर्णय घेतला आहे.

शनिवारी पेट्रोल-डिझेलवरील अबकारी करात कपात केली आहे. ही माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोलचे दर प्रति लिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर प्रति लिटर 7 रुपयांनी कमी होणार आहेत. याचबरोबर, केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलिंडर (12 सिलिंडरपर्यंत) 200 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली. 

पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरांमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे महागाईच्या झळा सर्वसामान्य जनतेला सोसाव्या लागत होत्या. आता केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आता हळूहळू जागतिक अर्थव्यवस्था बाहेर येत आहे. यासोबतच जगभरात उर्जेची मागणी वाढते आहे. परंतु मागणी वाढल्याने पुरवठा करण्यासाठी ठोस पावलं उचलली गेली नसल्याने गॅसच्या दरात लक्षणीय वाढ झाली होती.

तुमच्या शहरातील गॅसचे दर असे जाणून घ्या...
तुम्हाला तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरचे सध्याचे दर जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही सरकारी तेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्याविषयी माहिती घेऊ शकता. घरगुती गॅस सिलिंडरचा दर तपासण्यासाठी सरकारी तेल कंपनी IOC च्या वेबसाइटवर जावे लागेल. याठिकाणी कंपन्या दर महिन्याला नवे दर जारी करते. यासाठी तुम्हाला https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर क्लिक करावे लागेल. दर महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर केले जातात.

Web Title: 200 rupees cut in lpg cylinder, petrol and diesel prices also reduced significantly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.