Join us

१ एप्रिलला बदलून मिळणार नाही दोन हजारांची नोट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 5:39 AM

आरबीआयच्या सर्व १९ कार्यालयांमध्ये ही सुविधा बंद राहणार आहे.

मुंबई : १ एप्रिल २०२४ रोजी वार्षिक अकाऊंट क्लोजिंग डे असल्याने या दिवशी रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही शाखेत दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून दिल्या जाणार नाहीत तसेच जमाही केल्या जाणार नाहीत, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.  

आरबीआयच्या सर्व १९ कार्यालयांमध्ये ही सुविधा बंद राहणार आहे. परंतु २ एप्रिल रोजी ही सेवा पुन्हा सुरु केली जाणार आहे, असेही बँकेने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकव्यवसायबँक