Lokmat Money > बिझनेस न्यूज > २ हजारांच्या नोटा जमा करण्याची मुदत संपली, तरीही तुम्ही नोटा बदलू शकता; जाणून घ्या सविस्तर

२ हजारांच्या नोटा जमा करण्याची मुदत संपली, तरीही तुम्ही नोटा बदलू शकता; जाणून घ्या सविस्तर

२००० रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत ७ ऑक्टोबर रोजी संपली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 12:47 PM2023-10-08T12:47:12+5:302023-10-08T12:47:46+5:30

२००० रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत ७ ऑक्टोबर रोजी संपली आहे.

2000 notes deposit period is over, still you can exchange notes; Know in detail | २ हजारांच्या नोटा जमा करण्याची मुदत संपली, तरीही तुम्ही नोटा बदलू शकता; जाणून घ्या सविस्तर

२ हजारांच्या नोटा जमा करण्याची मुदत संपली, तरीही तुम्ही नोटा बदलू शकता; जाणून घ्या सविस्तर

भारतीय रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबरपर्यंत २००० रुपयांच्या नोटा बदलून किंवा जमा करण्याची मुदत दिली होती, जी नंतर ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली. आता ती बदलण्याची आणि जमा करण्याची अंतिम मुदत संपली आहे, पण त्यानंतरही तुम्ही २००० रुपयांची नोट बदलू शकता.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, ७ ऑक्टोबरनंतर कोणतीही बँक २००० रुपयांचे चलन स्वीकारणार नाही. मात्र, त्यानंतरही या नोटा कायदेशीर राहतील. पण, तरीही  तुमच्याकडेही दोन हजार रुपयांच्या नोटा असतील तर मुदत संपल्यानंतरही तुम्ही त्या बदलून जमा करू शकता. 

आरबीआयने ३० सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी केली होती, त्यानुसार बँका ८ ऑक्टोबरपासून २,००० रुपयांची नोट स्वीकारणार नाहीत आणि ती त्यांच्या खात्यात जमाही करणार नाहीत. तसेच, ती इतर कोणत्याही नोटासोबत बदलली जाणार नाही. मात्र, या नोटा तुम्हाला एका  प्रकारे नोट जमा आणि बदलून घेता येणार आहे.

RBI कार्यालयात जावे लागेल

यासाठी तुम्हाला RBI च्या १९ क्षेत्रीय कार्यालयांपैकी एकाला भेट द्यावी लागेल. तुम्ही कोणत्याही शाखेत जाऊन नोट बदलून मिळवू शकता किंवा तुमच्या बँक खात्यात जमा करू शकता. याशिवाय, तुम्ही पोस्ट ऑफिसद्वारे RBI कार्यालयात २००० रुपयांची नोट देखील पाठवू शकता.

दंड होणार का?

तुम्ही अजुनही २,००० रुपये बदलले नसल्यास, आता तुम्ही RBI च्या १९ कार्यालयांपैकी कोणत्याही एका कार्यालयात जाऊ शकता किंवा पोस्ट ऑफिसद्वारे पाठवू शकता. २,००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी RBI कोणतेही शुल्क आकारणार नाही.

RBI ची १९ प्रादेशिक कार्यालये

RBI च्या १९ प्रादेशिक कार्यालयांमध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना आणि तिरुवनंतपुरम यांचा समावेश आहे.

किती नोटा जमा करता येतील

आरबीआयनुसार, कोणतीही संस्था किंवा व्यक्ती २०,००० रुपयांपर्यंतच्या खात्यात २,००० रुपयांची नोट जमा किंवा बदलू शकते.

Web Title: 2000 notes deposit period is over, still you can exchange notes; Know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.