Join us

RBI: २ हजारांची नोट चलनातून बाहेर? १,२, ५ आणि १० रुपयांच्या शिक्क्यांबाबत RBI ची महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 10:58 AM

बाजारात २, ५, १०, २०, ५०, १००, २००, ५०० आणि २००० रुपये नोट जारी केले आहेत

ठळक मुद्देरिझर्व्ह बँकेनुसार आता बाजारात ५० पैसे, १ रुपये, २, ५, १० आणि २० रुपयांचे शिक्के चलनात आहेत. बाजारात जितक्या नोटा आहेत त्यातील कोणती नोट किती प्रमाणात आहे हेदेखील आरबीआयनं स्पष्ट केलं आहे.देशात जितके बँक नोट आहे त्यात ८५.७ टक्के ५०० आणि २००० बँक नोटा आहेत.

नवी दिल्ली – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI) नं गुरुवारी त्यांचा वार्षिक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टमध्ये रिझर्व्ह बँकेने आता आर्थिक व्यवहारासाठी कोणत्या नोटा आणि किती सिक्के वापरात आहेत ते सांगितलं आहे. आता किती रुपये आणि किती शिक्के जारी केले आहेत त्याचीही माहिती आरबीआयनं दिली. रिझर्व्ह बँकेच्या रिपोर्टमधून स्पष्ट झालं की, बाजारात २ हजारांच्या नोटेवर प्रतिबंध लावण्यात आले नाहीत. आरबीआयनं २ हजारांच्या नोटेवर बंदी आणली आहे अशी अफवा काही दिवसांपासून पसरली होती.

रिझर्व्ह बँकेच्या रिपोर्टनुसार, बाजारात २, ५, १०, २०, ५०, १००, २००, ५०० आणि २००० रुपये नोट जारी केले आहेत. त्याचसोबत अलीकडे आपण पाहिलं असेल बाजारात ५० पैसे शिक्के चलनात नाही परंतु आरबीआयने याबाबतही स्पष्टीकरण दिलं आहे. रिझर्व्ह बँकेनुसार आता बाजारात ५० पैसे, १ रुपये, २, ५, १० आणि २० रुपयांचे शिक्के चलनात आहेत. रिझर्व्ह बँकेकडून ते जारीही केले जातात. त्यातील कोणतेही सिक्के चलनातून बाहेर केले नाहीत.

बाजारात सध्या किती नोटा आहेत?

बाजारात जितक्या नोटा आहेत त्यातील कोणती नोट किती प्रमाणात आहे हेदेखील आरबीआयनं स्पष्ट केलं आहे. आर्थिक बाब पाहिली तर बाजारात ५०० आणि २ हजारांच्या बँक नोटा ८५.७ टक्के चलनात आहेत. म्हणजे देशात जितके बँक नोट आहे त्यात ८५.७ टक्के ५०० आणि २००० बँक नोटा आहेत. ३१ मार्च २०२० पर्यंत हे प्रमाण ८३.४ टक्के होते. ५०० रुपयांच्या नोटा सर्वाधित चलनात उपलब्ध आहे. त्यानंतर १० रुपयांच्या नोटांचे प्रमाण जास्त आहे. त्या बाजारात २३.६ टक्के चलनात आहेत.

प्रिटींगवर किती खर्च झाले?

रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी ९.७ टक्क्यांनी नोटांच्या चलनात घट झाली. १ जुलै २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत सिक्युरिटी प्रिटिंगवर एकूण ४ हजार १२ कोटी रुपये खर्च झालेत. मागील वर्षी जुलै २०१९ ते जून २०२० पर्यंत प्रिटिंगवर ४ हजार ३७७ कोटी रुपये खर्च झालेत. २०२० ते २०२१ कालावधीत २ लाख ८ हजार ६२५ बनावट नोटा पकडल्या गेल्या.

स्टेट बँकेकडे करंसी चेस्ट

करंसी नोट आणि सिक्का जारी करण्याचं काम रिझर्व्ह बँक करतं. त्याचे व्यवस्थापनही आरबीआय करतं. या कामात ऑफीस, करंसी चेस्ट, स्मॉल कॉइन डिपॉझिट मोठी भूमिका निभावते. ३१ मार्च २०२१ पर्यंत देशात स्टेट बँक ऑफ इंडियाकडे करेंसी चेस्ट नेटवर्कचा ५५ टक्के भाग आहे जो सर्व बँकांपेक्षा अधिक आहे. जुन्या आणि फाटलेल्या नोटांबद्दल आरबीआय(RBI) नं सांगितलं महामारीमुळे या नोटा बदलण्याबाबत थोडा विलंब झालाय. परंतु आता सर्व सुरळीत केले आहे.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक