Lokmat Money > बिझनेस न्यूज > डबे, कपाटातील नाेटा आटल्या; पाेहाेचल्या बॅंकांत, गुलाबी नाेट परत घेतल्याचा परिणाम

डबे, कपाटातील नाेटा आटल्या; पाेहाेचल्या बॅंकांत, गुलाबी नाेट परत घेतल्याचा परिणाम

दोन हजार रुपयांच्या नाेटा बॅंकेत जमा हाेत असल्यामुळे बॅंकांकडील जमा ठेव माेठ्या प्रमाणात वाढली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 07:44 AM2023-06-19T07:44:00+5:302023-06-19T12:30:20+5:30

दोन हजार रुपयांच्या नाेटा बॅंकेत जमा हाेत असल्यामुळे बॅंकांकडील जमा ठेव माेठ्या प्रमाणात वाढली आहे.

2000 notes reach in Banks: As a result of withdrawal of notes, fixed deposits also increased | डबे, कपाटातील नाेटा आटल्या; पाेहाेचल्या बॅंकांत, गुलाबी नाेट परत घेतल्याचा परिणाम

डबे, कपाटातील नाेटा आटल्या; पाेहाेचल्या बॅंकांत, गुलाबी नाेट परत घेतल्याचा परिणाम

नवी दिल्ली : सरकारने गेल्या महिन्यात दोन हजार रुपयांची नाेट चलनातून परत घेण्याचा निर्णय जाहीर केला हाेता. तेव्हापासून बाजारातील राेख कमी झाली आहे. आरबीआयच्या माहितीनुसार, २ जूनपर्यंत लाेकांकडील राेख रक्कम ८३ हजार २४२ रुपयांनी घटून ३२.८८ लाख काेटी एवढी राहिली आहे. दोन हजार रुपयांच्या नाेटा बॅंकेत जमा हाेत असल्यामुळे बॅंकांकडील जमा ठेव माेठ्या प्रमाणात वाढली आहे.

आरबीआयने यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार २ जून राेजी संपलेल्या पंधरवड्यात बॅंकांकडे १८७ लाख काेटी रुपये जमा हाेते. तर त्यापूर्वीच्या १९ मे राेजी संपलेल्या पंधरवड्यात बॅंकांकडील जमा रक्कम ५९ हजार रुपयांनी घटली हाेती. मार्च २०१७ पूर्वी २ हजार रुपयांच्या सुमारे ८९ टक्के नाेटा वितरित झाल्या हाेत्या. या नाेटांचे आयुष्यमान ४ ते ५ वर्षे हाेते. २०१९ पासून या नाेटांची छपाई  बंद करण्यात आली हाेती.

दोन हजार रुपयांच्या ५० टक्के नाेटा परत
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यापूर्वी सांगितले हाेते की, चलनातून १.८ लाख काेटी रुपये मूल्याच्या दोन हजार रुपयांच्या नाेटा परत आल्या आहेत. या नाेटांच्या एकूण चलनातील हा ५० टक्के वाटा आहे. ३१ मार्च राेजी ३.६२ लाख काेटी रुपयांच्या २ हजार रुपयांच्या नाेटा चलनात हाेत्या.

या काळात शेतकरी परेणीच्या कामाला लागतात. शाळा सुरू हाेतात. त्यामुळे बॅंकांमधून पैसे काढण्याचे प्रमाण वाढते. मात्र, यावेळी घट झाली आहे. दोन हजार रुपयांच्या नाेटा बॅंकेत जमा हाेण्याचे प्रमाण वाढत असल्याचे त्यातून स्पष्ट हाेत आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

Web Title: 2000 notes reach in Banks: As a result of withdrawal of notes, fixed deposits also increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक