नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने (आरबीआय) २० हजार कोटी रुपयांच्या सरकारी रोख्यांचे खुल्या बाजारातील व्यवहार (ओएमओ) दोन टप्प्यात करण्याचे ठरवले आहे. मंगळवारी हा निर्णय जाहीर करण्यात आला.
बाजाराची परिस्थिती आणि सध्याच्या व विकसित होणाऱ्या रोकड सुलभतेचा आढावा घेतल्यानंतर रिझर्व्ह बँकेने ओपन मार्केट आॅपरेशनअंतर्गत एकूण २० हजार कोटी रुपयांच्या सरकारी रोेख्यांची दोन टप्प्यात प्रत्येकी १० हजार कोटी रुपयांची एकाचवेळी खरेदी आणि विक्र ी करण्याचा निर्णय घेतला, असे बँकेने निवेदनात म्हटले. हा लिलाव २७ आॅगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी केला जाईल आणि त्याचा निकाल त्याच दिवशी जाहीर केला जाईल.कोरोना विषाणू महामारीचा वाढता धोका लक्षात घेता काही आर्थिक बाजार भागाना कडक आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. रिझर्व्ह बँक बाजाराची परिस्थिती आणि विद्यमान व विकसित होणाºया रोकड सुलभतेचा सतत आढावा घेत आहे.निविदा आणि बोली रिझर्व्ह बँकेच्या कोअर बँकिंग सोल्यूशनवर (ई-कुबेर) सकाळी दहा ते ११ या वेळेत सादर करणे गरजेचे आहे. यशस्वी सहभागीदारांना त्यांच्या करंट अकाऊंटमध्ये किंवा एसजीएल अकाऊंटमध्ये २८ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत आवश्यक तेवढी रक्कम उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे.