Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुद्रा बँकेमार्फत २० हजार कोटींचे कर्ज

मुद्रा बँकेमार्फत २० हजार कोटींचे कर्ज

पंतप्रधान मुद्रा बँक योजनेंतर्गत देशभरात आतापर्यंत कुटीर उद्योगांना २० हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले

By admin | Published: October 1, 2015 03:03 AM2015-10-01T03:03:32+5:302015-10-01T03:03:32+5:30

पंतप्रधान मुद्रा बँक योजनेंतर्गत देशभरात आतापर्यंत कुटीर उद्योगांना २० हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले

20,000 crores loan through Money Bank | मुद्रा बँकेमार्फत २० हजार कोटींचे कर्ज

मुद्रा बँकेमार्फत २० हजार कोटींचे कर्ज

मुंबई : पंतप्रधान मुद्रा बँक योजनेंतर्गत देशभरात आतापर्यंत कुटीर उद्योगांना २० हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय रसायने व खते राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज येथे पत्रपरिषदेत दिली.
एकेकाळी बाराबलुतेदारीमध्ये असलेल्या छोट्या व्यवसायांना आधुनिकतेची जोड देत कुटीर उद्योगांना चालना देण्यासाठीच्या देशभरात मुद्रा बँक योजनेंतर्गत सध्या कर्ज दिले जात आहे. हे कर्ज देण्याबाबत खासगी बँका अधिक चांगले योगदान देत आहेत, असे सांगून अहीर म्हणाले की, एखाद्या
व्यक्तीने घेतलेल्या कर्जापैकी काही रक्कम परत केली तर परत केलेल्या रकमेवर व्याज आकारले जात नाही. या कर्जासाठी कोणतेही तारण वा हमी घेतली जात नाही. १२ टक्के व्याज आकारले जाते.
आतापर्यंत ३१ लाख ८० हजार व्यक्तींना देशभरात कर्जवाटप करण्यात आले आहे. १० हजारापासून १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज या योजनेंतर्गत विविध बँकांकडून दिले जात आहे. फूटपाथवर व्यवसाय करणाऱ्यांचादेखील त्यात समावेश आहे. (विशेष प्रतिनिधी)
------------
‘जेनरिक’ची दुकाने
जेनरिक औषधांची एक हजारावर दुकाने पुढील महिन्यापासून देशभरात सुरू करण्यात येतील. फार्मसीची पदवी असलेल्या व्यक्ती, एनजीओंमार्फत ती चालविली जातील.
आधी या दुकानासाठीचे कमिशन १६ टक्के होते. ते आता २० टक्के करण्यात आले असून लवकरच ३० टक्क्यापर्यंत वाढविण्याचा विचार आहे. एका दुकानासाठी २.५० लाख रुपयांची सबसिडी दिली जाणार असल्याचे अहीर यांनी सांगितले.

Web Title: 20,000 crores loan through Money Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.