नवी दिल्ली - भारतातील लोकप्रिय टू-व्हीलर असलेली बजाज पल्सर आता नव्या रंगात आणि नव्या ढंगात बाजारात येत आहे. बजाज ऑटो पल्सरच्या 160 सीसी मॉडेल, पल्सर एनएस 160 यास एबीएसने सजावट करुन लाँच करण्यात येणार आहे. 2019 बजाज पल्सर एनएस 160 बाईकला ऑक्टोबर 2018 मध्ये लाँच करण्यात येणार आहे. या गाडीची शोरुम किंमत राजधानी दिल्ली येथे 82,624 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.
बजाज पल्सर एनएस 160 सिंगल चॅनेल एबीएसचे स्टँडर्ड फिचर देण्यात आले आहे. या गाडीचे डिझाईन जुन्या मॉडेलप्रमाणेच ठेवण्यात आले आहे. पण, काही कॉस्मेटीक बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये नवीन रंग आणि ग्राफिक्सचा समावेश आहे. या दुचाकीचे इंजिन 160.3 सीसी असणार आहे. बजाज ऑटो एलईडी डेटाइम रनिंग लाईटपेक्षा पल्सर एनएस 160 फेसलिफ्टची सजावट अधिक आकर्षक असणार आहे. त्यामुळे बजाजच्या या नव्या पल्सरला बाजारात मोठी मागणी येऊ शकते.
भारतीय बाजारात TVS Apache RTR 160 4V, Suzuki Gixxer, Yamaha FZ-S और Honda CB Hornet 160R या दुचाकी गाड्यांना बजाज पल्सर एनएस 160 गाडी टक्कर देईल, असे दिसून येते. या मॉडेलमध्ये 17 इंचचे अलॉय वील्ज देण्यात आले आहे. बिकिनी फेअरिंग आणि स्लीक टेल सेक्शनच्या या दुचाकीमध्ये अंडर बेली एग्जॉस्ट सिस्टम देण्यात आली आहे. या गाडीची नवी दिल्लीतील शोरूम किंमत 82,624 रुपये आहे. तर सिंगल चॅनेल एबीएस जोडल्यामुळे या गाडीची किंमत 95,000 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.