Lokmat Money > बिझनेस न्यूज > 2020 अंबानींसाठी लकी; दोन दिवस संपायला असताना रिलायन्सची आणखी एका कंपनीवर मालकी

2020 अंबानींसाठी लकी; दोन दिवस संपायला असताना रिलायन्सची आणखी एका कंपनीवर मालकी

Reliance industries, Mukesh Ambani 2020: एकापेक्षा एक अशी अब्जावधींची जागतिक गुंतवणूक आणि एकामागोमाग एक अशा कंपन्य़ांचे अधिग्रहण असा सपाटाच अंबानींना लावला होता. वर्ष संपायच्या आदल्या दिवशीही हा ओघ आसाच सुरु आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 02:36 PM2020-12-30T14:36:38+5:302020-12-30T14:38:05+5:30

Reliance industries, Mukesh Ambani 2020: एकापेक्षा एक अशी अब्जावधींची जागतिक गुंतवणूक आणि एकामागोमाग एक अशा कंपन्य़ांचे अधिग्रहण असा सपाटाच अंबानींना लावला होता. वर्ष संपायच्या आदल्या दिवशीही हा ओघ आसाच सुरु आहे.

2020 for Mukesh Ambani: RIL completes acquisition of IMG Worldwide LLC's stake | 2020 अंबानींसाठी लकी; दोन दिवस संपायला असताना रिलायन्सची आणखी एका कंपनीवर मालकी

2020 अंबानींसाठी लकी; दोन दिवस संपायला असताना रिलायन्सची आणखी एका कंपनीवर मालकी

नवी दिल्ली : 2020 हे वर्ष अन्य कंपन्यांना कितीही कसोटीचे गेले असेल मात्र, रिलायन्सच्यामुकेश अंबानींना कोरोनाशापित वर्ष खूप चांगले गेले आहे. एकापेक्षा एक अशी अब्जावधींची जागतिक गुंतवणूक आणि एकामागोमाग एक अशा कंपन्य़ांचे अधिग्रहण असा सपाटाच अंबानींना लावला होता. वर्ष संपायच्या आदल्या दिवशीही हा ओघ आसाच सुरु आहे.

 
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या स्पोर्टस मॅनेजमेंट जॉईंट व्हेंचर आयएमजी रिलायन्स लिमिटेडमध्ये (IMG-R) आयएमजी वर्ल्डवाईडची हिस्सेदारीच खरेदी केली आहे. रिलायन्सने आज शेअर बाजाराला याची माहिती दिली. 28 डिसेंबर 2020 ला कंपनीने आयएमजी-आरचे इक्विटी शेअरचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. अशाप्रकारे आयएमजी- आर आता पूर्णपणे रिलायन्सच्या मालकीची कंपनी बनली आहे. 


देशातील सर्वाधिक मुल्याची असलेली कंपनी रिलायन्सने गेल्या आठवड्यातच या खरेदी व्यवहाराची घोषणा केली होती. क्रीडा क्षेत्रात असलेली आयएमजी वर्ल्डवाईडची हिस्सेदारी 52.08 कोटी रुपयांत खरेदी करणार आहे. रिलायनन्सने 2010 मध्ये इंटरनॅशनल स्पोर्स आणि मार्केटिंर व मॅनेजमेंट कंपनी सोबत जॉईंट व्हेंचर केले होते. याद्वारे देशातील क्रीडा आणि मनोरंजनाचा विकास करणे हा उद्देश होता. 


टर्नओव्हर किती? 
आयएमजी स्पोर्ट, फॅशन आणि इव्हेंट्स व मीडियाच्या क्षेत्रात जगातील अव्वल कंपनी आहे. तिचा व्यवसाय 30 हून अधिक देशांमध्ये पसरलेला आहे. ही कंपनी एंडेवर नेटवर्क (Endeavor network) चा भाग आहे. आयआमजी आप भारतात स्पोर्टिंग, फॅशन आणि एंटरटेनमेंट इव्हेंट्समध्ये क्रिएशन, मॅनेजमेंट, इंप्लिमेंटशन आणि कमर्शिअलायझेशनच्या व्यवसायात होती. २०२० मध्ये कंपनीचा टर्नओवर 181.70 कोटी रुपये आणि नेट प्रॉफिट 16.35 कोटी रुपये होते. 

Web Title: 2020 for Mukesh Ambani: RIL completes acquisition of IMG Worldwide LLC's stake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.