नवी दिल्ली : 2020 हे वर्ष अन्य कंपन्यांना कितीही कसोटीचे गेले असेल मात्र, रिलायन्सच्यामुकेश अंबानींना कोरोनाशापित वर्ष खूप चांगले गेले आहे. एकापेक्षा एक अशी अब्जावधींची जागतिक गुंतवणूक आणि एकामागोमाग एक अशा कंपन्य़ांचे अधिग्रहण असा सपाटाच अंबानींना लावला होता. वर्ष संपायच्या आदल्या दिवशीही हा ओघ आसाच सुरु आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या स्पोर्टस मॅनेजमेंट जॉईंट व्हेंचर आयएमजी रिलायन्स लिमिटेडमध्ये (IMG-R) आयएमजी वर्ल्डवाईडची हिस्सेदारीच खरेदी केली आहे. रिलायन्सने आज शेअर बाजाराला याची माहिती दिली. 28 डिसेंबर 2020 ला कंपनीने आयएमजी-आरचे इक्विटी शेअरचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. अशाप्रकारे आयएमजी- आर आता पूर्णपणे रिलायन्सच्या मालकीची कंपनी बनली आहे.
देशातील सर्वाधिक मुल्याची असलेली कंपनी रिलायन्सने गेल्या आठवड्यातच या खरेदी व्यवहाराची घोषणा केली होती. क्रीडा क्षेत्रात असलेली आयएमजी वर्ल्डवाईडची हिस्सेदारी 52.08 कोटी रुपयांत खरेदी करणार आहे. रिलायनन्सने 2010 मध्ये इंटरनॅशनल स्पोर्स आणि मार्केटिंर व मॅनेजमेंट कंपनी सोबत जॉईंट व्हेंचर केले होते. याद्वारे देशातील क्रीडा आणि मनोरंजनाचा विकास करणे हा उद्देश होता.
टर्नओव्हर किती? आयएमजी स्पोर्ट, फॅशन आणि इव्हेंट्स व मीडियाच्या क्षेत्रात जगातील अव्वल कंपनी आहे. तिचा व्यवसाय 30 हून अधिक देशांमध्ये पसरलेला आहे. ही कंपनी एंडेवर नेटवर्क (Endeavor network) चा भाग आहे. आयआमजी आप भारतात स्पोर्टिंग, फॅशन आणि एंटरटेनमेंट इव्हेंट्समध्ये क्रिएशन, मॅनेजमेंट, इंप्लिमेंटशन आणि कमर्शिअलायझेशनच्या व्यवसायात होती. २०२० मध्ये कंपनीचा टर्नओवर 181.70 कोटी रुपये आणि नेट प्रॉफिट 16.35 कोटी रुपये होते.