नवी दिल्ली : आगामी पाच ते सहा वर्षांत म्हणजेच २०२४-२५ पर्यंत भारतातील हवाई वाहतूक बाजार ब्रिटनला मागे टाकून जगातील तिस-या क्रमांकाचा मोठा बाजार होईल, असा अंदाज इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने (आयटा) म्हटले आहे. २०३७ पर्यंत जगातील विमान प्रवाशांची संख्या ८.२ अब्ज होईल, असेही आयटाने म्हटले आहे.
आयटाने म्हटले की, २०२४ च्या मध्यापर्यंत अमेरिकेला मागे टाकून चीन जगातील पहिल्या क्रमांकाचा हवाई वाहतूक बाजार बनू शकतो. या वेळी अमेरिका दुसºया स्थानी फेकली जाईल. २०२४-२५ पर्यंत भारतही ब्रिटनला धक्का देऊन तिसºया स्थानी येईल. भारताच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने जारी केलेल्या सप्टेंबरच्या देशांतर्गत हवाई वाहतुकीच्या आकडेवारीतूनही भारतातील विमान प्रवास क्षेत्राच्या गतिमान वृद्धीला दुजोरा
मिळताना दिसत आहे. यंदाच्या पहिल्या नऊ महिन्यांत भारतीय विमान प्रवाशांचा आकडा १० कोटींच्या पुढे गेला आहे. हा आकडा पार करायला २०१७ मध्ये ११ महिने लागले होते. सन २०१६ मधील पूर्ण वर्षाची विमान प्रवासी संख्या ९९.९ लाख इतकी होती.
भारतातील विमान प्रवासी संख्या झपाट्याने वाढली असली, तरी त्या तुलनेत देशात विमानतळ आणि संबंधित अन्य पायाभूत सुविधांचा विकास म्हणावा तितका झालेला नाही. दिल्ली आणि मुंबई येथील विमानतळांवर तर सध्या कसलीही जागाच शिल्लक राहिलेली नाही, असे दिसून आले आहे.
>२०२४-२५ पर्यंत भारताचे हवाई वाहतूक बाजार ब्रिटनला मागे टाकून जगातील तिसºया क्रमांकाचा मोठा हवाई बाजार होईल
२०२४ पर्यंत भारताचे हवाई क्षेत्र जगात तिसऱ्या स्थानी झेप घेणार
आगामी पाच ते सहा वर्षांत म्हणजेच २०२४-२५ पर्यंत भारतातील हवाई वाहतूक बाजार ब्रिटनला मागे टाकून जगातील तिस-या क्रमांकाचा मोठा बाजार होईल, असा अंदाज इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने (आयटा) म्हटले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 03:29 AM2018-10-26T03:29:11+5:302018-10-26T03:29:19+5:30