Lokmat Money > बिझनेस न्यूज > ईपीएफओ फंडात गुंतवणार २२ हजार कोटी

ईपीएफओ फंडात गुंतवणार २२ हजार कोटी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) २२,५०० कोटी रुपये आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये एक्स्चेंज ट्रेड फंडात (ईटीएफ) गुंतवणार आहे.

By admin | Published: June 12, 2017 12:17 AM2017-06-12T00:17:17+5:302017-06-12T00:17:17+5:30

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) २२,५०० कोटी रुपये आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये एक्स्चेंज ट्रेड फंडात (ईटीएफ) गुंतवणार आहे.

22 thousand crore to invest in EPFO ​​fund | ईपीएफओ फंडात गुंतवणार २२ हजार कोटी

ईपीएफओ फंडात गुंतवणार २२ हजार कोटी

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) २२,५०० कोटी रुपये आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये एक्स्चेंज ट्रेड फंडात (ईटीएफ) गुंतवणार आहे. ईपीएफओच्या विश्वस्तांची गेल्या महिन्यात इक्विटी किंवा इक्विटीशी संबंधित योजनांत गुंतवणूक वाढवण्यास मान्यता मिळाली.
वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओच्या या सर्वोच्च मंडळाने ही गुंतवणूक १० टक्क्यांवरून १५ टक्के करण्यास मान्यता दिली. २०१६-२०१७ वर्षात ईपीएफओने १.५ लाख कोटी रुपये गुंतवले होते.
चालू आर्थिक वर्षात इनव्हेस्टिबल डिपॉझिट्सदेखील अंदाजे १.५ लाख कोटी रुपये आहेत, असे ईपीएफओचे सेंट्रल प्रॉव्हिडंट फंड कमिशनर व्ही. पी. जॉय म्हणाले. ते म्हणाले, ‘‘ईपीएफओने ईटीएफमध्ये आतापर्यंत २३ हजार कोटी रुपये गुंतवले आहेत व त्यावरील वार्षिक परतावा हा १२ टक्क्यांपेक्षाही जास्त आहे.

Web Title: 22 thousand crore to invest in EPFO ​​fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.