Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतात २.३६ लाख कोट्यधीश!

भारतात २.३६ लाख कोट्यधीश!

एशिया पॅसिफिक क्षेत्रात कोट्यधीशांचा विचार करता भारत चौथ्या क्रमांकावर येतो. एका अहवालानुसार भारतात उच्च संपत्ती (एचएनआय) असणाऱ्या व्यक्तींची संख्या २.३६ लाख आहे.

By admin | Published: January 20, 2016 03:11 AM2016-01-20T03:11:50+5:302016-01-20T03:11:50+5:30

एशिया पॅसिफिक क्षेत्रात कोट्यधीशांचा विचार करता भारत चौथ्या क्रमांकावर येतो. एका अहवालानुसार भारतात उच्च संपत्ती (एचएनआय) असणाऱ्या व्यक्तींची संख्या २.३६ लाख आहे.

2.36 million crore in India! | भारतात २.३६ लाख कोट्यधीश!

भारतात २.३६ लाख कोट्यधीश!

नवी दिल्ली : एशिया पॅसिफिक क्षेत्रात कोट्यधीशांचा विचार करता भारत चौथ्या क्रमांकावर येतो. एका अहवालानुसार भारतात उच्च संपत्ती (एचएनआय) असणाऱ्या व्यक्तींची संख्या २.३६ लाख आहे.
१२.६0 लाख लोकांसह जवान या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. ‘न्यू वेल्थ वर्ल्ड’च्या एशिया पॅसिफिक २0१६ संपत्ती अहवालानुसार श्रीमंत लोकांचा विचार करता भारत या प्रदेशात पहिल्या पाच देशात येतो. ज्यांची निव्वळ संपत्ती १0 लाख डॉलर (६.७0 कोटी रुपये) किंवा त्यापेक्षा जास्त होते, अशांचाच या यादीत समावेश आहे.
२0१५ या अखेरपर्यंत जपानमधील कोट्यधीशांची संख्या १२.६0 लाख होती. या यादीत चीन ६.५४ लाख कोट्यधीशांसह दुसऱ्या स्थानावर येतो. त्यानंतर २.९0 लाख कोट्यधीशांसह आॅस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे.
या यादीत २.२६ लाख कोट्यधीशांसह सिंगापूर पाचव्या, २.१५ लाख कोट्यधीशांसह हाँगकाँग सहाव्या, १.२५ लाख कोट्यधीशांसह दक्षिण कोरिया सातव्या, ९२ हजार २00 कोट्यधीशांसह तैवान आठव्या, ८९ हजार कोट्यधीशांसह न्यूझीलंड नवव्या, तर ४८,५00 कोट्यधीशांसह इंडोनेशिया दहाव्या स्थानावर
आहेत.
या यादीतील गमतीचा भाग असा आहे की, खासगी संपत्तीच्या बाबतीत पहिल्या पाच देशांत भारताचा समावेश असला तरीही प्रतिव्यक्ती उत्पन्नाच्या बाबतीत भारताचा क्रमांक सर्वात खाली येतो.
भारतात एकूण व्यक्तिगत संपत्ती ४,३६५ अब्ज डॉलर आहे. या यादीत चीन १७,२५४ अब्ज डॉलरसह प्रथम क्रमांकावर आहे. त्याचवेळी प्रतिव्यक्ती उत्पन्नाचा विचार करता अंतिम तीन जणांत भारत तळाला आहे. येथे प्रतिव्यक्ती उत्पन्न ३,५00 डॉलर आहे. २,0४,000 या आकड्यांसह आॅस्ट्रेलिया प्रथम क्रमांकावर
आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: 2.36 million crore in India!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.