नवी दिल्ली : देशातील कर थकबाकीदारांची यादी आयकर विभागाने जाहीर केली आहे. या यादीत २४ व्यक्ती आणि कंपन्यांचा समावेश असून, त्यांच्याकडे एकूण ४९० कोटी रुपयांचा कर थकला आहे. हे लोक एक तर बेपत्ता आहेत अथवा कर भरण्यासाठी पैसे नसल्याचे सांगत आहेत.आयकर विभागाने देशातील प्रमुख दैनिकांत एक जाहिरात प्रसिद्धीस देऊन थकबाकीदारांची नावे जाहीर केली आहेत. या लोकांकडे आयकर आणि कंपनी कराची थकबाकी आहे.हे थकबाकीदार अन्नप्रक्रिया, सोने-चांदी, सॉफ्टवेअर, जमीन-जुमला, ब्रेवरीज आणि वस्तू उत्पादन या क्षेत्रातील आहेत.
४९० कोटी थकविणाऱ्या २४ व्यक्ती, संस्थांची नावे जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 5:23 AM