जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अरनाॅल्ट यांनी त्यांच्या कंपनीची उपशाखा ‘ख्रिश्चन डीओर’ या कंपनीची जबाबदारी मुलगी डेल्फिन हिच्यावर साेपविली आहे. भारतातही अनेक मोठ्या उद्योगपतींनी आपल्या मुलींच्या खांद्यावर जबाबदारी टाकली आहे. एका अभ्यासानुसार, सध्या भारतातील २४ टक्के फॅमिली बिझनेस महिला चालवित आहेत. यात ७६% महिला पित्याचा, तर २४ टक्के महिला पतीचा व्यवसाय सांभाळत आहेत.
डेल्फिन अरनाॅल्ट
बर्नार्ड अरनाॅल्ट यांची कन्या डेल्फिन ही २०१३ पासून त्यांच्या कंपनीत कार्यकारी उपाध्यक्ष पदावर कार्यरत हाेती.
इशा अंबानी
मुकेश अंबानी यांची मुलगी इशा ही २०१४ पासून रिलायन्स जिओ व रिलायन्स रिटेलची जबाबदारी सांभाळतेय.
लेह टाटा
नोएल टाटा यांची मुलगी लेह ही २०२२ पासून ताज हॉटेल समूहाची जबाबदारी सांभाळत आहे.
निसाबा गोदरेज : आदी गोदरेज यांची मुलगी निसाबा गोदरेज ही २०१७ पासून गोदरेज समूहाची कार्यकारी अध्यक्ष आहे.
रोशनी नाडर
शिव नाडर यांची मुलगी रोशनी हिने २०२० मध्ये एचसीएलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.
विनिता गुप्ता
देशबंधू गुप्ता यांची मुलगी विनिता गुप्ता २०१३ पासून तिसरी मोठी औषधी कंपनी लुपिनच्या प्रमुख पदावर आहे.