अकोला : कोरडवाहू शेतकर्यांच्या उपजीविकेला स्थैर्य देण्यासाठी राज्य शासनाने कोरडवाहू शेती अभियान कार्यक्रम हाती घेतला आहे. या अभियानावर येत्या पाच वर्षांत दोन हजार कोटी खर्च केला जाणार असून, यंदा राज्यातील ४०३ गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी २५ कोटींचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यातील पिकांखालील क्षेत्र २२५ लाख हेक्टर असून, त्यापैकी ८० टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. पावसाच्या अनियमिततेचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होत असल्यामुळे या क्षेत्रातील शेतकर्यांच्या उपजीविकेला अद्यापही स्थैर्य प्राप्त होऊ शकले नाही. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गतवर्षापासून राज्यात कोरडवाहू शेती अभियानांतर्गत मनुष्यबळ विकास व शेतीसाठी लागणारी विविध संसाधन, प्रक्रिया व पणन या घटकांचा वापर करण्याचे ठरवले आहे. या कार्यक्रमासाठी येत्या पाच वर्षांत २० हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यातील दोन हजार कोटींची तरतूद कोरडवाहू शेती अभियान योजनेस स्वंतत्ररीत्या करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
कोरडवाहू शेतीसाठी यंदा २५ कोटी रुपये
कोरडवाहू शेतकर्यांच्या उपजीविकेला स्थैर्य देण्यासाठी राज्य शासनाने कोरडवाहू शेती अभियान कार्यक्रम हाती घेतला आहे.
By admin | Published: May 19, 2014 10:44 PM2014-05-19T22:44:17+5:302014-05-19T22:44:17+5:30