Lokmat Money > बिझनेस न्यूज > घरात पडून असलेल्या सोन्यावर मिळू शकते २.५० टक्के व्याज

घरात पडून असलेल्या सोन्यावर मिळू शकते २.५० टक्के व्याज

gold : सोन्याचे दागिने सांभाळणे हे तसे जोखमीचे असते. त्यामुळे अनेक जण बँक लॉकर भाड्याने घेऊन त्यात दागिने ठेवतात; पण दागिने बँकेत ठेवायचे असल्यास लॉकरचे शुल्क भरावे लागते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 05:14 AM2021-08-21T05:14:30+5:302021-08-21T05:14:46+5:30

gold : सोन्याचे दागिने सांभाळणे हे तसे जोखमीचे असते. त्यामुळे अनेक जण बँक लॉकर भाड्याने घेऊन त्यात दागिने ठेवतात; पण दागिने बँकेत ठेवायचे असल्यास लॉकरचे शुल्क भरावे लागते.

2.50 per cent interest can be earned on gold lying at home | घरात पडून असलेल्या सोन्यावर मिळू शकते २.५० टक्के व्याज

घरात पडून असलेल्या सोन्यावर मिळू शकते २.५० टक्के व्याज

नवी दिल्ली : घरात निष्क्रिय पडून असलेल्या दागिन्यांवर नागरिकांना व्याज देणारी एक आकर्षक योजना रिझर्व्ह बँकेने आणली असून, या योजनेत नागरिकांना २.५० टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते.

सोन्याचे दागिने सांभाळणे हे तसे जोखमीचे असते. त्यामुळे अनेक जण बँक लॉकर भाड्याने घेऊन त्यात दागिने ठेवतात; पण दागिने बँकेत ठेवायचे असल्यास लॉकरचे शुल्क भरावे लागते.  पण हेच दागिने तुम्ही सोने रोखीकरण योजनेंतर्गत (गोल्ड मनिटायझेशन स्कीम) बँकेत ठेवल्यास तुम्हाला त्यावर व्याज  मिळू शकते. ही योजना बँकेच्या मुदत ठेवीसारखी आहे. 
यात नागरिकांना घरी पडून असलेले सोने बँकेत जमा करता येते. मुदतीअंती नागरिकांना त्यांचे सोने किंवा सोन्याचे मूल्य व्याजासह परत मिळते.

एचडीएफसी बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) यासह अनेक बँका ट्विटरवर आरबीआयच्या सोने रोखीकरण योजनेचा प्रचार करताना दिसत आहेत. 

Web Title: 2.50 per cent interest can be earned on gold lying at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं