- मनोज गडनीस, मुंबईमंदीचे सावट संपून अर्थव्यवस्थेत पुन्हा सुधार दिसून येत असला तरी कर्जाच्या वसुलीत मात्र अद्यापही अच्छे दिन आलेले नाहीत. २०१५ च्या वर्षी कर्ज प्रमाणात मोठी वाढ झाली असून थकीत कर्जाच्या प्रमाणात ४० टक्के वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे.देशातील अग्रगण्य अशा दोन ते तीन वित्तीय विश्लेषण संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, २०१५ मध्ये थकीत कर्जाच्या प्रमाणात ४० टक्क्यांची वाढ झाली असून हे कर्ज थकविणाऱ्या लोकांचा व उद्योगांचा एकत्रित आकडा हा ३०० आहे. एकत्रितपणे सुमारे २५,९८५ कोटी रुपयांचे कर्ज २०१५ च्या वर्षात थकले आहे. तीन वर्षात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली वाढ चिंतनीय असल्याचे मत अर्थविश्लेषकांनी व्यक्त केले आहे. कर्ज थकविणाऱ्या कंपन्यांच्या आकड्यामध्ये वाढ झालेली असतानाच, दुसरीकडे सुमारे ६४५ कंपन्या अशा आहेत की, ज्यांनी नियमितपणे कर्जाची परतफेड न केल्याने त्यांचे पतमानांकन घटले. या कर्जाचे प्रमाण आकडेवारीत एक लाख ७९ हजार कोटी रुपये आहे. २०१४ मध्ये मंदी असूनही कर्जाची परतफेड नियमितपणे न केल्याने पतमानांकन घटविलेल्या कंपन्यांची संख्या १४२ इतकी होती. २०१५ मध्ये पतमानांकन घटलेल्या कंपन्यांच्या आकड्यामध्ये वाढ झाली आहे.नवे कर्ज मिळविणेही अवघडअर्थकारणात सुधार येत असल्याचे म्हटले जात असले तरी, अद्यापही चलनवाढ, कर्जाचे चढे दर आणि उत्पादन क्षेत्रातील मंदी, लालफितीत अडकलेले व रखडलेले प्रकल्प यामुळे अनेक उद्योगांना नवे कर्ज मिळविणे आणि जून्या कर्जाचे हप्ते फेडणे अशक्य झाले आहे. त्यातूनच थकीत कर्जाची टक्केवारी वाढली आहे.
३०० कंपन्यांकडे २५ हजार कोटी
By admin | Published: January 12, 2016 2:11 AM