Join us

श्रीकृष्ण जन्माष्टमीला देशभरात 25000 कोटींचा व्यवसाय, फेस्टिव्ह सीझनची धमाकेदार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 20:02 IST

Janmashtami 2024: यापूर्वी रक्षाबंधनाच्या दिवशी 10 हजार कोटींचा व्यवसाय झाला होता.

Janmashtami 2024: श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. देशभरातील मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, देशातील व्यावसायिकांसाठी जन्माष्टमीचा सण आनंद घेऊन आला आहे. या सणानिमित्त देशभरातील बाजारपेठांमध्ये सुमारे 25 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे. 

CAT ने आकडेवारी जाहीर केलीकॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) चे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, या महत्त्वाच्या सणानिमित्त फुले, फळे, मिठाई, देवाचे पोशाख, मेकअपचे साहित्य, उपवासाच्या मिठाई, दूध-दही, लोणी आणि सुक्या मेव्याची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. जन्माष्टमीसारखे सण देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होते.

देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजनकॅटचे ​​राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया म्हणाले की, जन्माष्टमीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा सण उत्तर आणि पश्चिम भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली. याशिवाय, विशेष कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आलेहोते. डिजिटल टॅबलेक्स, सेल्फी पॉईंट विथ भगवान कृष्ण आणि इतर अनेक मनमोहक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात, संतांची भजने, धार्मिक नृत्यांचा आणि प्रवचनांचा क्रम सुरुच होता. सामाजिक संस्थांनीही अनेक ठिकाणी जन्माष्टमी साजरी केली.

व्यावसायिकांना मोठ्या अपेक्षा यापूर्वी 19 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशीही व्यावसायिकांना मोठा फायदा झाला होता. CAT च्या अंदाजानुसार, रक्षाबंधन 2024 ला 10 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय झाला. एकाच महिन्यात आलेल्या या दोन सणांनी बाजारपेठेचा रंगच बदलून टाकला आहे. आता ऑक्टोबरमध्ये नवरात्री आणि दिवाळी आहे. या दोन सणांपासून व्यापाऱ्यांना खूप अपेक्षा आहेत.

 

टॅग्स :जन्माष्टमीव्यवसाय