Join us

अ‍ॅडव्हान्स टॅक्सच्या रकमेत २५.५ टक्के घट; दुसऱ्या तिमाहीमध्ये सुधारली स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 6:12 AM

चालू आर्थिक वर्षाच्या दुस-या तिमाहीत जमा झालेली अ‍ॅडव्हान्स टॅक्सची रक्कम १,५९,०५७ कोटी रुपये एवढी झाली.

मुंबई : कोरोनाच्या प्रभावामुळे पहिल्या तिमाहीमध्ये करांच्या वसुलीत झालेल्या प्रचंड घसरणीनंतर चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये कर संकलन काहीसे वाढले असले तरी अद्याप त्याची घट सुरूच आहे. १५ सप्टेंबरपर्यंतच्या तिमाहीत जमा झालेल्या अ‍ॅडव्हान्स टॅक्सची रक्कम ही मागील वर्षाच्या तुलनेत २५.५ टक्क्यांनी कमीच राहिली आहे.चालू आर्थिक वर्षाच्या दुस-या तिमाहीत जमा झालेली अ‍ॅडव्हान्स टॅक्सची रक्कम १,५९,०५७ कोटी रुपये एवढी झाली.मागील वर्षीच्या याच कालावधीत २,१२,८८९ कोटी रुपयांचा अ‍ॅडव्हान्स टॅक्स जमा झाला होता. याचाच अर्थ मागील वर्षापेक्षा यावर्षी जमा झालेल्या कराच्या रकमेत २५.५ टक्के कपात झाली आहे.चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कर संकलन ७६ टक्के असे प्रचंड प्रमाणात घटले होते.दुसऱ्या तिमाहीमध्ये सुधारली स्थितीअ‍ॅडव्हान्स टॅक्स भरणाºया कंपन्या व व्यक्तींना आपल्या अंदाजित कराच्या रकमेपैकी १५ टक्के रक्कम पहिल्या तिमाहीत, प्रत्येकी २५ टक्के रक्कम पुढील २ तिमाहींमध्ये तर उर्वरित ३५ टक्के रक्कम चौथ्या तिमाहीत भरावयाची असते.दुसºया तिमाहीत कंपन्यांनी १,२९,६१९.६० कोटी रुपये अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरला आहे. मागील वर्षापेक्षा ही रक्कम २७.३ टक्क्यांनी कमी झाली आहे. त्याचप्रमाणे वैयक्तिक प्राप्तिकरदात्यांनी २९,४३७.५० कोटी रुपये जमा केले आहेत.मागील वर्षी याच कालावधीत ३४,६३२.९० कोटी रुपये जमा झाले होते. याचाच अर्थ या कालावधीत १५ टक्के रक्कम कमी जमा झाली आहे. टीडीएसमार्फत १,३८,६०५.२० कोटी रुपये जमा झाले आहेत.

टॅग्स :कर