नीलेश शहाकार, बुलडाणा
राज्यातील ऊस गाळप हंगाम साधारणपणे आॅक्टोबर महिन्यात सुरू होते. मात्र बऱ्याच खाजगी आणि सहकारी साखर कारखान्याकडे कोट्यवधीचे कर्जाची थकबाजी आहे. शिवाय यंदा अपुऱ्या पावसामुळे ऊस उत्पादनाला मोठा फटका बसल्यामुळे राज्यातील २६ कारखाने गाळपातून वगळण्यात आले आहेत.
राज्यामध्ये २०१४-१५ हंगामामध्ये ९९ सहकारी व ७९ खाजगी अशा एकूण १७८ साखर कारखान्यांनी गाळप घेतलेले होते. मात्र यापैकी बऱ्याच साखर कारखान्यांवर कर्जाची थकबाकी चढत आहे. त्यामुळे २०१५-१६ मध्ये गाळप हंगामातून २६ कारखाने वगळण्यात आले असून यंदा राज्यातील ९० सहकारी व ६२ खाजगी असे एकूण १५२ साखर कारखाने गाळप करणार आहेत.
नागपूर, अमरावती, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, अहमदनगर, नांदेड या सात विभागातील खाजगी आणि सहकारी १७८ साखर कारखान्यांकडून गाळप केले जाते. २०१५ अखेरपर्यंत ऊस देयके थकीत अहवालात राज्यातील बऱ्याच साखर कारखान्यांकडे एकूण २०१६.१७ कोटी रुपये कर्ज रक्कम थकीत आहे. त्यामुळे या साखर कारखान्यांना यंदाच्या गाळप हंगामातून वगळण्यात आले आहे.
दोन लाख हेक्टरला फटका
राज्यात यंदा २५ लाख ऊस उत्पादक शेतक-यांनी दहा लाख हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड केली. त्यानुसार ८३६ लाख मेट्रिक टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. परंतु यंदा पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे ऊसाच्या वाढीवर परिणाम झाला. हुमणी, वाळवी आणि दांडा पोखरणारी अळी अशा विविध रोगकिडींचा प्रार्दुभाव होऊन राज्यातील दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला फटका बसला आहे. यामुळे उसाच्या उत्पादनात सरसरी ३० टक्के घट होण्याची शक्यता असून ऊस उत्पादनासह साखर कारखान्याचा गाळपाचा हंगाम संकटात येऊ
शकतो.
२६ कारखान्यांचे यंदा गाळप नाही...!
राज्यातील ऊस गाळप हंगाम साधारणपणे आॅक्टोबर महिन्यात सुरू होते. मात्र बऱ्याच खाजगी आणि सहकारी साखर कारखान्याकडे कोट्यवधीचे कर्जाची थकबाजी आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2015 12:27 AM2015-10-14T00:27:29+5:302015-10-14T00:27:29+5:30