Lokmat Money > बिझनेस न्यूज > २७ वित्त संस्थांचे परवाने रिझर्व्ह बँकेने केले रद्द

२७ वित्त संस्थांचे परवाने रिझर्व्ह बँकेने केले रद्द

२५ संस्था मुंबई व परिसरातील आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 12:15 AM2018-09-18T00:15:10+5:302018-09-18T00:15:32+5:30

२५ संस्था मुंबई व परिसरातील आहेत

27 financial institutions have canceled the permits issued by the Reserve Bank | २७ वित्त संस्थांचे परवाने रिझर्व्ह बँकेने केले रद्द

२७ वित्त संस्थांचे परवाने रिझर्व्ह बँकेने केले रद्द

मुंबई : रिझर्व्ह बँकेने सोमवारी २७ बिगर बँकिंग वित्त संस्थांचे (एनबीएफसी) परवाने रद्द केले. त्यापैकी २५ संस्था मुंबई व परिसरातील आहेत. भारतात सहा प्रकारच्या एनबीएफसी कार्यरत आहेत. या एनबीएफसी बँकांकडून ११ ते १३ टक्के व्याजदारने कर्ज घेत असतात आणि ग्राहकांना १६ ते २३ टक्के दराने यातून कर्जाचा पुरवठा करतात. कर्ज पुरवठा करताना एनबीएफसीना किमान २ कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवावा लागतो. असा निधी राखीव न ठेवणाऱ्या संस्थांचे परवाने रिझर्व्ह बँकेकडून रद्द केले जातात. अशीच कारवाई रिझर्व्ह बँकेने सोमवारी केली.
जून ते आॅगस्टदरम्यान २०० हून एनबीएफसींचे परवाने रिझर्व्ह बँकेने रद्द केले आहेत. बँकेने या महिन्यातील पहिली मोठी कारवाई सोमवारी केली. या कारवाईतील २७ मध्ये गोवा, पुणे आणि नवी मुंबईतील प्रत्येकी एका संस्थांचा समावेश आहे. उर्वरित संस्था मुंबई व उपनगरातील आहेत.

लक्ष ठेवण्याच्या सूचना
देशभरात जवळपास १२ हजार एनबीएफसी आहेत. त्यापैकी ८२ टक्के संस्था जोखिमयुक्त व्यवहार करीत आहेत.
त्यामुळे त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवावे, अशी सूचना केंद्रीय वित्त मंत्रालयाने मे महिन्यात रिझर्व्ह बँकेला दिली होती.
त्यानुसार रिझर्व्ह बँक जूनपासून सातत्याने एनबीएफसींवर कारवाई करीत आहे.

Web Title: 27 financial institutions have canceled the permits issued by the Reserve Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.