Join us  

खनिज तेल महागल्याने सेन्सेक्स २७ हजारांवर

By admin | Published: October 08, 2015 5:05 AM

जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे ऊर्जा आणि खाण क्षेत्रातील समभागांची मागणी वाढली. याचा परिणाम म्हणून बुधवारी भारतीय शेअर बाजारांत तेजीचे वातावरण

मुंबई : जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे ऊर्जा आणि खाण क्षेत्रातील समभागांची मागणी वाढली. याचा परिणाम म्हणून बुधवारी भारतीय शेअर बाजारांत तेजीचे वातावरण दिसून आले. सलग सहाव्या दिवशी तेजी दर्शविणारा मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १0२.९७ अंकांनी वाढून २७ हजार अंकांवर पोहोचला. खरे म्हणजे आजचे सत्र अत्यंत अस्थिर राहिले. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी २६,९६६.८६ अंकांवर तेजीसह उघडला. त्यानंतर मात्र नफा वसुलीचा फटका बसून तो घसरणीला लागला. त्यानंतर सेन्सेक्सने पुन्हा सुधारणा करण्यात यश मिळविले. २७ हजार अंकांचा टप्पाही त्याने ओलांडला. सत्राच्या अखेरीस १0२.९७ अंकांची अथवा 0.३८ टक्क्यांची वाढ नोंदवून सेन्सेक्स २७,0३५.८५ अंकांवर बंद झाला. २१ आॅगस्टनंतरची ही सर्वोच्च पातळी ठरली. गेल्या पाच दिवसांत सेन्सेक्सने १,३१६.0४ अंकांची वाढ नोंदविली. ५0 कंपन्यांच्या व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २४.५0 अंकांनी अथवा 0.३0 टक्क्यांनी वाढून ८,१७७.४0 अंकांवर बंद झाला. वाहन क्षेत्रात आज चांगली खरेदी दिसून आली. आगामी सणासुदीच्या काळात गाड्यांची खरेदी वाढण्याच्या अपेक्षेने ही खरेदी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. बजाज आॅटोचा समभाग ३.१४ टक्क्यांनी वाढला. टाटा मोटर्स, मारुती सुझुकी यांचे समभागही वाढले.