Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्लॉट नव्हे, वाळूसाठीच मोजले अब्जावधी; विक्रमी किंमतीत विकला भूखंड

प्लॉट नव्हे, वाळूसाठीच मोजले अब्जावधी; विक्रमी किंमतीत विकला भूखंड

दुबईच्या जुमेरा बेटावरील भूखंडाचा व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 10:31 AM2023-04-26T10:31:01+5:302023-04-26T10:31:18+5:30

दुबईच्या जुमेरा बेटावरील भूखंडाचा व्यवहार

278 crore rupees were calculated for the sand, not the plot in dubai jumera be iland | प्लॉट नव्हे, वाळूसाठीच मोजले अब्जावधी; विक्रमी किंमतीत विकला भूखंड

प्लॉट नव्हे, वाळूसाठीच मोजले अब्जावधी; विक्रमी किंमतीत विकला भूखंड

दुबई : येथील 'जुमेरा बे' बेटावरील २४,५०० चौरस फुटाचा भूखंड विक्रमी १२५ दशलक्ष दिरहमला म्हणजेच सुमारे २७८ कोटी रुपयांना विकला गेला आहे. खरेदीदार दुबईचा मूळ निवासी नसून त्याने कौटुंबिक सुट्या घालविण्यासाठी हा भूखंड खरेदी केला आहे, असे समजते.

'जुमेरा बे' हे दुबईच्या समुद्रकिनाऱ्याजवळ कृत्रिमरीत्या बनविण्यात आलेले वाळूचे बेट आहे. तेथील मालमत्ता अतिश्रीमंत लोक खरेदी करतात. ब्रोकरेज संस्था 'नाइट फ्रँक'चे प्रमुख ॲण्ड्रयू कमिंग यांनी व्यवहाराची माहिती दिली आहे. कमिंग यांनी सांगितले की, आतापर्यंत येथील बंगले अथवा लक्झरी पेंटहाऊस विक्रमी किमतीत विकले जात होते. रिकामा भूखंड प्रथमच विक्रमी किंमतीत विकला गेला आहे. 

जगभरातील श्रीमंतांना का आवडे दुबई?

ब्रिटनच्या फॅशन रिटेलरने २ वर्षांपूर्वी हा भूखंड ३६.५ दशलक्ष दिरहमला (सुमारे १८१.४३ कोटी रुपये) खरेदी केला होता. तो त्याने आता ८८.५ दशलक्ष दिरहमला विकला. दोन वर्षांत त्यास १९७ कोटी रुपयांचा फायदा झाला.

दुबई भूमिअभिलेख कार्यालयातील नोंदीनुसार

ब्रिटनच्या फॅशन रिटेलरने २ वर्षांपूर्वी हा भूखंड ३६.५ दशलक्ष दिरहमला (सुमारे १८१.४३ कोटी रुपये) खरेदी केला होता. तो त्याने आता ८८.५ दशलक्ष दिरहमला विकला. दोन वर्षांत त्यास १९७ कोटी रुपयांचा फायदा झाला.

Web Title: 278 crore rupees were calculated for the sand, not the plot in dubai jumera be iland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.