Lokmat Money > बिझनेस न्यूज > ९० दिवस रोज २ जीबी डेटा, गेम्स आणि ओटीटी बेनिफिट्स, या कंपनीनं आणले दोन ‘पैसा वसूल’ प्लॅन्स

९० दिवस रोज २ जीबी डेटा, गेम्स आणि ओटीटी बेनिफिट्स, या कंपनीनं आणले दोन ‘पैसा वसूल’ प्लॅन्स

तुम्हाला OTT चे मोफत सबस्क्रिप्शन आणि दीर्घ वैधता, भरपूर डेटा हवे असल्यास हे दोन नवीन प्लॅन तुमच्या कामाचे ठरणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 04:34 PM2022-10-09T16:34:18+5:302022-10-09T16:34:52+5:30

तुम्हाला OTT चे मोफत सबस्क्रिप्शन आणि दीर्घ वैधता, भरपूर डेटा हवे असल्यास हे दोन नवीन प्लॅन तुमच्या कामाचे ठरणार आहेत.

2GB data games and OTT benefits per day for 90 days government bsnl company has introduced two new prepaid plans know details airtel jio vodafone idea | ९० दिवस रोज २ जीबी डेटा, गेम्स आणि ओटीटी बेनिफिट्स, या कंपनीनं आणले दोन ‘पैसा वसूल’ प्लॅन्स

९० दिवस रोज २ जीबी डेटा, गेम्स आणि ओटीटी बेनिफिट्स, या कंपनीनं आणले दोन ‘पैसा वसूल’ प्लॅन्स

तुम्हाला OTT चे मोफत सबस्क्रिप्शन आणि दीर्घ वैधता, भरपूर डेटा हवा असल्यास BSNL चे दोन नवीन प्लॅन तुमच्या कामाचे ठरणार आहेत. भारत संचार निगम लिमिटेडने (BSNL) दोन नवीन प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहेत.  STV269 आणि STV769 असे हे दोन प्लॅन्स आहेत. ज्यांना 30 किंवा 90 दिवसांच्या वैधतेचे पॅक हवे आहेत अशा लोकांसाठी हे प्लॅन्स तयार करण्यात आलेत. या दोन्ही प्लॅनमध्ये समान अतिरिक्त फायदे उपलब्ध आहेत, फक्त फरक वैधतेमध्ये आहे. जाणून घेऊया दोन्ही प्लॅन्सबद्दल अधिक माहिती.

269 रुपयांचा प्लॅन
BSNL च्या 269 रुपयांच्या नवीन प्रीपेड प्लॅनमध्ये 2GB दैनिक डेटा मिळतो. या प्लॅनची ​​एकूण वैधता 30 दिवसांची आहे आणि यात अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, तसंच दररोज 100 एसएमएस मिळतात. या प्लॅनमध्ये BSNL ट्यून्सची सुविधादेखील मिळते. ग्राहकांना कोणत्याही मर्यादेशिवाय गाणी बदलण्याची सुविधाही देण्यात येते. या प्लॅनमध्ये चॅलेंज एरिना गेम्स, इरॉस नाऊ एंटरटेनमेंट, लिसन पॉडकास्ट सर्व्हिसेस, हार्डी मोबाइल गेम सर्व्हिस, लोकधुन आणि झिंग यासह आणखी फायदे आहेत.

769 रुपयांचा प्लॅन
बीएसएनएलचा 769 रुपयांचा प्लॅनही 269 रुपयांच्या प्लॅनसारखाच आहे. 769 रुपयांच्या या प्लॅनमध्ये एकूण 90 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. यामध्ये यूजर्सना दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 SMS मिळतात. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेले अतिरिक्त फायदे वर नमूद केलेल्या 269 रुपयांच्या प्लॅनसारखेच आहेत. दरम्यान बीएसएनएलनं हे दोन नवे प्लॅन्स लाँच केले आहेत. सर्वच खासगी टेलिकॉम कंपन्यांसोबत बीएसएनएलनंही आता कॅलेंडर मंथ वाले प्लॅन्स सुरू केले आहेत.

Web Title: 2GB data games and OTT benefits per day for 90 days government bsnl company has introduced two new prepaid plans know details airtel jio vodafone idea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.