Join us

३ अपार्टमेंट, २६३ कोटी किंमत, १३ कोटींची स्टॅम्प ड्युटी; वाचा कोणी केली मुंबईत ही खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 12:41 PM

मुंबईतील मलबार हिल हे देशातील सर्वात महागडे निवासी क्षेत्र मानलं जातं.

परम कॅपिटल रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका आशा मुकुल अग्रवाल (Asha Mukul Agrawal) यांनी मुंबईतील लोढा मलबारमध्ये ३ लक्झरी अपार्टमेंट्स खरेदी केले आहेत. हे अपार्टमेंट्स मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडकडून २६३ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले आहेत. मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड हे प्रामुख्यानं लोढा ग्रुप म्हणून ओळखले जाते. IndexTap.com ला मिळालेल्या कागदपत्रांवरून ही माहिती समोर आली आहे. लोढा मलबार हा लोढा समूहाचा लक्झरी प्रकल्प आहे आणि तो वाळकेश्वर रोड, मलबार हिल येथे आहे. मुंबईतील मलबार हिल हे देशातील सर्वात महागडे निवासी क्षेत्र मानलं जातं.परम कॅपिटल ही एक आघाडीची कॅपिटल मार्केट ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट फर्म आहे. आशा मुकुल अग्रवाल यांचे पती मुकुल अग्रवाल हे परम कॅपिटलचे संस्थापक आहेत. २७ सप्टेंबर रोजी त्यांच्या मुंबईतील व्यवहाराची नोंदणी करण्यात आली. आशा मुकुल अग्रवाल यांनी २५ व्या मजल्यावर अंदाजे १३२ कोटी रुपयांच्या करार मूल्यावर दोन अपार्टमेंट खरेदी केले आहेत. यावर त्यांनी ६.६३ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे. दोन्ही अपार्टमेंट ९७१९ चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेले आहेत आणि ५ कार पार्किंगसह येतात. याशिवाय आशा यांनी २४ व्या मजल्यावर अंदाजे १३०.२४ कोटी रुपयांना एक अपार्टमेंट खरेदी केले आहे. ज्यासाठी त्यांनी ६.५१ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे. अपार्टमेंट ९,५३५ स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेले आहे. सोबतच ५ कार पार्किंग देखील आहेत.नीरज बजाज यांनीही घेतलेलं अपार्टमेंटयापूर्वी मार्च महिन्यात फॅमी केअर लिमिटेडच्या चेअरमन ज्योती प्रसाद तपारिया आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लोढा मलबार प्रोजेक्ट्सच्या दोन टॉवर्समध्ये २६, २७, २८ व्या मजल्यावर ६ अपार्टमेंट खरेदी केले होते. याची किंमत ३६९.५५ कोटी रुपये होती. मार्च महिन्यातच बजाज ऑटोचे चेअरमन नीरज बजाज यांनीही लोढा मलबारमध्ये २९, ३० आणि ३१ व्या मजल्यावरील ट्रिपलेक्स २५२.५० कोटींना खरेदी केला होता.जून महिन्यात मायक्रोटेक डेव्हलपर्सनं लोढा मलबारमध्ये दोन अपार्टमेंट्स कंदोई फॅब्रिक्स लिमिडेटच्या डायरेक्टरना १०९ कोटींना विकले होते. जुलै महिन्यात बरवले सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर राजेंद्र बरवाले यांनी आपल्या कुटुंबीयांसब मलबार हिलमध्ये १२२ कोटींचं अपार्टमेंट खरेदी केलं होतं. 

टॅग्स :मुंबई